मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

 चिखली (कटूसत्य वृत्त):- गांधी विद्यालय चिखली येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जलराज जी चोबे व प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव माननीय श्री अघोर आर पी, श्री चव्हाण एस जी हे होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री कमलाकर सावंत सर व माननीय श्री सोमनाथ काजळे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या चिखली येथील स्वातंत्र्य सेनानी कै पंडित शास्त्री गोविंदराव अघोर , कै आबाराव भानुदास चोबे व कै दत्तोबा भोसले मानोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

आजच्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती नसून हैदराबाद संस्थान निजाम राजवट रझाकार चळवळ व राष्ट्रीय शाळा हिप्परगा स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान कासिम रिझवी व रझाकार संघटना व तत्कालीन कलेक्टर मोहम्मद हैदर व चिलवडी नंदगाव देवधानोरा या जवळील गावाचा इतिहास गृहमंत्री सरदार पटेल यांचे योगदान काही दत्तोबा भोसले मातोळकर यांचे योगदान ऑपरेशन पोलो पोलीस ऍक्शन या बाबींची सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिली दरवर्षी एक सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत व्याख्यानाचे आयोजन माननीय श्री कमलाकर सावंत सर व माननीय श्री सोमनाथ काजळे सर गावोगावी जाऊन करीत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण जी के यांनी तर प्रास्ताविक माननीय श्री चव्हाण एस जी यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages