काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व केळी वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व केळी वाटप

 काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व

 केळी वाटप


 पंढरपूर   (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी केंद्रिय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस सोमवार दि. 4 रोजी पंढरपुरात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रारंभी महाद्वारातील संत नामदेव पायरी येथे महाआरती करण्यात आली. त्यानंतर ना. सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस व श्रावणी सोमवारचे औचित्य साधून भाविकांना केळी व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. राजेश भादुले, वरिष्ठ उपाध्यक्ष नागन्नाथ अधटराव, ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द. बडवे, सरचिटणीस, देवानंद इरकल, सेवादलाचे अध्यक्ष गणेश माने, उपाध्यक्ष सागर कदम, युवक शहराध्यक्ष संदिप शिंदे, उत्पात साहेब, सहचिटणीस शिवकुमार भावलेकर यांच्यासह शहर, तालुका काँग्रेस, विविध कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाला उपस्थित राहून शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पाठींबा देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages