अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघ जिल्हाध्यक्षपदी राजेश धोकटे यांची नियुक्ती
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त): अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्लीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी येथील राजेश धोकटे (सर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र शाखेची त्रैमासिक बैठक येथील भक्तीमार्गावरील योग भवन येथे रविवार दि. 3 रोजी पार पडली. यावेळी राज्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी राजेश धोकटे (सर) यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायण पाथरकर, प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे तसेच एस. एस. टोनी, रेखा वर्मा, बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी., मनोज भांडारकर, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे, संतोष मुळे, सुर्यकांत भिसे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायण पाथरकर, प्रदेशाध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते राजेश धोकटे (सर) यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर बोलताना धोकटे सर यांनी, शिंपी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहून काम करणार असल्याचे सांगितले. या निवडीनंतर संत नामदेव शिंपी समाज कार्यकारणी मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. राजेश धोकटे सर हे संत नामदेव शिंपी समाजाचे विश्वस्त, केशवराज संस्थेचे सदस्य, दि. पंढरपूर मर्चन्ट बँक शाखा मार्केट यार्डचे सल्लागार, कवठेकर प्रशाला शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून अ.भा. नामदेव क्षत्रिय महासंघाने सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती केली आहे.
यावेळी अध्यक्ष गणेश उंडाळे, दि. पंढरपूर मर्चन्ट बँकेचे संचालक व समाजाचे उपाध्यक्ष संजय जवंजाळ, खजिनदार शशिकांत जवंजाळ, विश्वस्त जगन्नाथ म्हैंदरकर, विलास पोरे, महेश गाणबोटे, संजय चांडोले, अनंता पतंगे (म्हेत्रे), जयवंत कांबळे, दत्तप्रसाद निपाणकर, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट, प्रथमेश परांडकर, दत्ता चांडोले, माजी अध्यक्ष राजेश कपडेकर, शिवकुमार भावलेकर, प्रसाद निकते, अक्षय चांडोले, निलेश धोकटे आदी समाज बांधव उपस्थित होते. या निवडीबद्दल राजेश धोकटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment