जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज या घटनेचा पंढरपुरात पांडुरंग परिवार आणि परिचारक गटाकडून तीव्र निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज या घटनेचा पंढरपुरात पांडुरंग परिवार आणि परिचारक गटाकडून तीव्र निषेध

 जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात झालेल्या

 लाठीचार्ज या घटनेचा पंढरपुरात पांडुरंग परिवार आणि परिचारक गटाकडून

 तीव्र निषेध


पंढरपुर (कटूसत्य वृत्त):- पांडुरंग परिवार आणि परिचारक गटाकडून युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग परिवारातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन.  तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन दिले.

जालना येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत असताना. पंढरपुरात देखील या घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पांडुरंग परिवार आणि परिचारक गटाच्या झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भाचा निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्त्वात बाजार समितीचे सभापती हरीश दादा गायकवाड, पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे सर, उपसभापती राजुबापू गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत भैय्या देशमुख, अरुण घोलप, संतोष घोडके, हरी गावंधरे, अरुण नागटिळक, सुभाष मस्के, महादेव लवटे, नारायण रोंगे, माऊली हळनवर, समाधान रोंगे, रमेश हाके, रणजितसिंह जाधव, आबासाहेब पवार, हर्षल कदम, मोहन काळे, लक्ष्मण शिंदे यांच्या सह सर्व नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पंढरपूर तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन दिले.

परिचारक गटाकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये संबंधित घटनेची चौकशी करून सकल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकारने आग्रही भूमिका घ्यावी. त्याचबरोबर संबंधित जखमी मराठा बांधवांना आर्थिक मदत करावी. अशा आशयाच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसेच घडलेल्या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी पांडुरंग परिवार आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि त्यांचा संपूर्ण परिचारक गट हा मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणी संदर्भात परिचारक कुटुंबीय आणि पांडुरंग परिवार हा खांद्याला खांदा लावून उभा राहील. आणि मराठा समाजाच्या सोबत राहील. असा विश्वासही यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages