जालना येथे मराठा बांधवांनवर झालेल्या लाठीचार्ज चा आपने काळी फीत बांधून केला निषेध..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

जालना येथे मराठा बांधवांनवर झालेल्या लाठीचार्ज चा आपने काळी फीत बांधून केला निषेध..!

 जालना येथे मराठा बांधवांनवर झालेल्या लाठीचार्ज चा आपने काळी फीत बांधून केला निषेध..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जालना येथे मराठा आरक्षण संबंधी न्याय मागणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध करताना आपचे पदाधिकारी म्हणाले, भाजपच्या भ्रष्ट आणि अहंकारी सरकारने निर्दोष मराठा बांधवांनवर लाठी चालवली, हवेत गोळी चालवली, तसेच अश्रूधुर फोडले. निर्दोष मराठा बांधवांना अमानुष पणे मारण्यात आले. महिलांवर आणि लहान मुलांवर सुद्धा लाठी चालवली. आम आदमी पार्टी या घटनेची निंदा करत आहे. हे सगळं खूप त्रासदायक आणि अयोग्य आहे. भाजपला सत्तेचा घमंड आला आहे. असे म्हणत आपने या घटनेचा निषेध केला. शनिवारी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यालयाच्या बाहेर आपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस राजीनाम्या द्या अश्या घोषणा दिल्या. आपने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य सरकार कडे तीन मागणी केली आहे. 1) या अमानुष लाठीचार्जे मध्ये जखमी झालेल्या मराठा बांधवांना शासनातर्फे भरपाई आणि आर्थिक मदत देण्यात यावी. 2) राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. 3) या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यावेळी कार्याध्यक्ष निहाल किरनळ्ळी, ऍड.खतीब वकील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, निलेश संगेपाग, आनंद जाधव, राजेंद्र भोसले, श्रीकांत वाघमारे, विनायक पवार, मल्लिकार्जुन पिलगेरी, जुबेर हिरापुरे, सुचित्रा वाघमारे, श्रीकांत भरले, संदीपान सोनावणे, श्रावण सोनावणे, नासिर मंगलगिरी, अनिल वाले, महेश अवताडे, अल्ताब तांबोळी, वेदांत बुदत्त, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages