Hot Posts

6/recent/ticker-posts

लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न.

 लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न.

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  पंढरपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स मार्फत विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या शाळेत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात होती व गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

        भारतीय स्टेट बँक पंढरपूर शाखेमार्फत सौ.काजल सौदागर जाधव व राहुल मिसाळ यांनी ही स्पर्धा घेतली.या स्पर्धेतील निकाल कु.प्रियदर्शनी योगेश चव्हाण  (प्रथम क्रमांक),कु.शर्वरी शेखर रेडे-पाटील (व्दितीय क्रमांक),कु.विजयालक्ष्मी रेवन भोळे  (तृतीय क्रमांक) तर कु.सारा नौशाद शेख (उत्तेजनार्थ बक्षीस) व आलियान मोहसीन शेख (उत्तेजनार्थ बक्षीस) यांच्या चित्रांची निवड करण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन राहुल मिसाळ यांच्या हस्ते खाऊ देण्यात आले यावेळी शाळेच्या संचालिका नुरजहाँ फकृद्दीन शेख व सहकारी शिक्षिका गुलशन नशीब शेख उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments