सोलापूरात दि.11, 12 सप्टेंबर रोजी होणार भव्य मेकअप महोत्सव...!
सौंदर्यतज्ञ श्रीनिवास कोंडूर यांची माहिती...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या फॅशनेबल युगात प्रत्येकालाच फॅशन ने भुरळ घातली असून हेअर स्टाईल, मेकअप कडे अनेकांना आकर्षित केलंय. सोलापूरकरांची हीच गरज ओळखून मेक 4 हेअर आणि सलून संघाच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्य आणि दिव्य मेकअप महोत्सव सोलापुरातील वेदा लॉन्स या ठिकाणी 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 6 या वेळात होणार असल्याची माहिती सौंदर्यतज्ञ श्रीनिवास कोंडूर आणि रेखा अग्रवाल यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सौंदर्यतज्ञ श्रीनिवास कोंडूर म्हणाले, " सोलापूर शहरात प्रथमच पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठा मेकअप महोत्सव मेक 4 हेअर, BHEE INDIA संयुक्त श्री संत सेना महाराज नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 11 आणि 12 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये सौंदर्यतज्ञ व सलून यांचे भव्य प्रदर्शन होणार असून एकाच छताखाली 12 सौंदर्य दिगज्यांना भेटण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांना मिळणार असून या महोत्सवामध्ये बहुसंख्य शौकिनांनी सहभागी व्हावे. या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी 2400 रुपये फी असून मेकअप हेअर आणि प्रोफेशन बाय मुख्य ब्युटिशियन रेखा अग्रवाल आणि श्रीनिवास कोंडूर एकूण 15 ब्युटिशियन जेन्ट्स व लेडीज या सेमिनारमध्ये हेअर ट्रीटमेंट, केस मेकअप, विविध प्रकारच्या ॲडव्हान्स मेकअप, ॲडव्हान्स हेअर स्टाईल, जेन्टस हेअर पार्लर आणि लेडीज ब्युटी पार्लर हे या मेकअप महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. या मेकअप महोत्सवामध्ये *संतोषी, अमिषा साळुंखे, बिजल गडा, मनीषा गव्हाणे, विराज पाटील, अतुरेन, रेश्मा गुजर, गीतांजली पाटील, श्रीया चुरी, अमृता रणसिंग, अनुप्रिया पाटील, आणि विद्या खोत आदी बारा सौंदर्य दिग्गज यांना भेटण्याची सुवर्णसंधी मेक फोर हेअर सलून संस्थेच्या आणि श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेच्या वतीने सोलापूरकरांना मिळणार आहे. सोलापुरात प्रथमच होणाऱ्या या भव्य आणि दिव्य मेकअप महोत्सवांमध्ये सोलापूरकरांनी सहभागी होऊन प्रवेश घ्यावा असे आवाहन ब्युटीशियन रेखा अग्रवाल, श्रीनिवास कोंडूर, पद्मा कोंडूर, गीतांजली पाटील, बिजल गडा यांनी केलं आहे. हा भव्य आणि दिव्य मेकअप महोत्सव वेदा लॉन्स, जुडिओ च्या पाठीमागे इंद्रधनु अपार्टमेंट जवळ मरीआई चौक सोलापूर येथे होत आहे. तरी या भव्य आणि दिव्य मेकअप महोत्सवाचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा. आणि त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन संयोजक आनंद सिंगराल, अभय कुमार कांती, अनिल कोंडूर, शेखर कोंडापुरे, भारत क्षीरसागर, राजू शुक्ल वार, शिवराज हडपद, मनीष गंजाळकर, पांडुरंग पवार, आणि मोहन जमदाडे यांनी मेकअप हेअर संस्थेच्या आणि संत सेना नाभिक दुकानदार संघाच्यावतीने केलंय.
.jpg)
0 Comments