कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महापालिका कामगार संघर्ष
समितीची स्थापना...!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आणि महापालिकेच्या विविध विभागात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देण्यासाठीच 10 संघटनांनी वज्रमुठ आवळून कामगार संघटना संघर्ष समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक जनार्दन शिंदे,अध्यक्ष सायमन गट्टू आणि जनरल सेक्रेटरी चांगदेव सोनवणे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जनार्दन शिंदे आणि चांगदेव सोनवणे म्हणाले की, " सोलापूर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या अनुक्रमे कामगार शक्ती युनियन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन, महानगरपालिका कर्मचारी स्टाफ असोसिएशन, सफाई मजदूर काँग्रेस, धर्मवीर हद्दवाढ कर्मचारी संघटना, आरोग्य निरीक्षक संघटना, महापालिका फार्मासिस्ट कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना आधी सर्व 10 संघटनांनी एकत्र येत एकाच महापालिका कामगार संघटना संघर्ष समिती स्थापन केली असून या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार असून लोकसंख्येच्या प्रमाणात कामगारांची भरती करणे कामी नव्या आकृतीबंधासाठी लक्ष देणे, महापालिका कर्मचाऱ्यांचे थकीत महागाई भत्ते शासनाने लागू करणे, महापालिका कर्मचाऱ्यांचे थकीत रुपये 350 कोटी येणे बाकी वसूल करणे, कर्मचाऱ्यांना पाचवा सहावा आणि सातवा वेतन आयोगाच्या रकमा मिळवून देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा सेवानिवृत्तीच्या वेळीच देण्यास महापालिकेला भाग पाडणे, आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करणे, आकृतीबंधानुसार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर स्थानिक उमेदवाराची नियुक्ती करणे, कर्मचारी भरती प्रक्रिया बाह्य यंत्रणे ऐवजी सेवक निवड समिती मार्फत करणे, महापालिकेत बेकायदा आणि मनमानीपणे होणाऱ्या नेमणुकीस आळा घालणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, लाड कमिटीच्या शिफारसी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी लढा उभारणे, याबरोबरच रोजंदारीतील 834 तिसऱ्या टप्प्यातील सेवानिवृत्तांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संघर्ष समिती लोकशाही मार्गाने सातत्याने महानगरपालिकेला आंदोलन करणार असून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जेव्हा जीवदान असेपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं यावेळी संस्थापक जनार्दन शिंदे, सायमन गट्टू जनरल सेक्रेटरी चांगदेव सोनवणे आणि कार्याध्यक्ष दिलावर मणियार यांनी सांगितलं आहे.
यावेळी संघर्ष समितीची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आलीअसून या कामगार संघटनेच्या संघर्ष समितीच्या संस्थापक पदी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, अध्यक्षपदी सायमन गट्टू, कार्याध्यक्षपदी दिलावर मनियार, उपाध्यक्षपदी बापूसाहेब सदाफुले, डी. एस. म्हेत्रे, मल्लिकार्जुन हुणजे, संगीता गुरव, के.बी. माने, जनरल सेक्रेटरी पदी चांगदेव सोनवणे, सेक्रेटरी म्हणून माऊली पवार आणि सहज सेक्रेटरी म्हणून इकबाल तडकल तर खजिनदार पदी विद्या मोरे आणि संघटक प्रमुख म्हणून भालचंद्र साखरे, श्रीनिवास रामगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर दत्तात्रय गायकवाड, महादेव ढेकणे, अंजनाया म्हेत्रे, गंगाधर मामा मल्लाडे, संजीव गुंजाळ ,गणेश डेंगळे, रेशमा तलफदार, गीता तम शेट्टी, रेणुका कावील, शिवाजी कांबळे, सादिक शेख, शेखर (मल्लू) सकट, भीम सिताफळे, प्रसन्नजीत शिंगे, आणि केरबा माने आदींची कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आलं. येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच्या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघर्ष समिती रात्रीचा दिवस करेल आणि कामगारांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही यावेळी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे.
.png)
0 Comments