बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये नव्या तंत्राने परिणामकारक अध्यापन होणे
गरजेचे शिक्षणतज्ञ डॉ अश्विन बोंदार्डे यांचे मत; अनगर येथे शिक्षक
सन्मान सोहळा संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- बदलत्या शिक्षण पद्धतीत विविध तंत्राचा वापर करुन परिणामकारक अध्यापन करणे गरजेचचे असून विद्यार्थ्यांना शहाणपणा शिकवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे. शिक्षकांनी लेखन वाचन करावे असेही मत कस्तुरबाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोलापूरचे प्राचार्य ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अश्विन बोंदार्डे यांनी मांडले अनगर येथे श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माध्यमिक,उच्च माध्यमिक, बाबुराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, स्टोन ब्रिज पब्लिक स्कूल व अनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ डॉ. अश्विन बोंदार्डे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळराजे पाटील हे होते. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी २०० शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, प्राचार्य महेश करंडे, प्राचार्य तुळशीदास ढेरे, उपप्राचार्य सिताराम बोराडे यांच्यासह सर्व प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी केले आभार सिताराम बोराडे यांनी व्यक्त केले.
आज विद्यार्थ्यांना माहिती व ज्ञान देण्याची अनेक माध्यमे निर्माण झालेली आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती व ज्ञान मिळते आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी कायम अपडेट असले पाहिजे. त्यांनी नव नवीन बदल स्वीकारले पाहिजेत.
बाळराजे पाटील
अध्यक्ष श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ अनगर
.jpg)
0 Comments