अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील ६५ जणांचा सन्मान
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मसलेचौधरी (ता. मोहोळ) येथील कै. धनंजय तुकाराम लंबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात सेवेकरी भजनीमंडळ व आयोजक अशा ६५ जणांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, श्रीफळ आणि हरिपाठाचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी मोहोळ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष कौशिक गायकवाड, हणमंत पोटरे उपस्थित होते. ईश्वराच्या आधी संतांचा मान असतो. विठु माऊलीच्या दर्शनाअगोदर संत नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेतले जाते. त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताहामधील प्रत्येक घटकाचा श्रीनिवास माने, शुभांगी लंबे, हिमांगी वडणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मसलेचौधरीचे सरपंच दीपक चव्हाण,हनुमंत पोटरे, अभिजित गायकवाड, विपुल वडणे, तात्यासाहेब कोळी, ज्ञानेश्वर लंबे, मधुकर लंबे, अर्णव माने, राजवीर गायकवाड, वंदना गायकवाड, शकुंतला लंबे, कौस्तुभ लंबे, कल्पना लंबे, कल्याणी लंबे तसेच अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे प्रदीप शिरसाट, हरिदास शिरसाट, सचिन शिरसाट, मानाजी शिरसाट, सीताबाई कुंभार, मथुरा राऊत, ललिता पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह भजनीमंडळे उपस्थित होती.

No comments:
Post a Comment