प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजील गांधींच्या जयंतीचा कार्यक्रम आवरून आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडल्यानंतर लगेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, सोलापूर काँग्रेस भवनात आज राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, अशोक निंबर्गी या नेत्यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करत असताना काँग्रेस उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि सुभाष वाघमारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

कार्यक्रम संपल्यानंतर प्रणिती शिंदे बाहेर पडल्या आणि कार्यकर्तेसुद्धा भवनातून बाहेर पडू लागले. यावेळी बंदपट्टे आणि वाघमारे यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. या प्रकारानंतर कार्यर्त्यांना आरडाओरड केली आणि शहराध्यक्ष नरोटे यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थांबला. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages