निमगाव येथे रविवारी होणार वावडी महोत्सव, सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांची उपस्थिती
अकलूज (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण महाराष्ट्रभर आकर्षण असणारा निमगाव वावडी महोत्सव व मुली व महिलांसाठी हिरकणी महोत्सव रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वा निमगाव -पिलीव रस्ता ,नंदोबा मंदिरा शेजारी आयोजित केला असून या वावडी व हिरकणी महोत्सवाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुप्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वावडी व हिरकणी महोत्सवचे आयोजक निनाद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी वावडी महोत्सव संयोजन समितीचे सदस्य विश्वनाथ मगर, दत्तात्रय मगर ,जयसिंग मोरे ,नंदकुमार मगर पाटील ,युवराज मगर, नितीन मगर, प्रमोद मगर , गंगाधर पवार,विलास मगर आदी मान्यवर उपस्थित होते
5 फुटापासून ते 30 फुटापर्यंतच्या वावड्या तयार करणे व त्या उडविणे हा अनोखा व पारंपारिक खेळ निमगाव ता माळशिरस येथे नागपंचमीनिमित्त अनेक पिढ्यांपासून खेळला जातो अलीकडील 4 वर्षापासून निमगाव वावडी महोत्सव च्या माध्यमातून या पारंपारिक कलेचा स्पर्धेच्या माध्यमातून जतन केले जात असून या माध्यमातून प्रत्येक गटा नुसार रोख रकमेची बक्षिसे दिली जातात या स्पर्धेत तरुणाईचा सहभाग मोठा असतो सन 2023 च्या वावडी महोत्सव स्पर्धेसाठी एक फूट ते सात फूट, सात फूट ते तेरा फूट व तेरा फूट ते व त्यावरील सर्व असे तीन गट केले असून प्रत्येक गटात रोख रकमेची चार बक्षिसे व सन्मान चिन्ह सुप्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे
याचबरोबर महिलांसाठी हिरकणी महोत्सव आयोजित केला असून महिलांसाठी होणाऱ्या हिरकणी महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये महिलांना विशेष आकर्षण असणारी कोण होणार पैठणीचे मानकरी याचबरोबर मिक्सर ,कुकर व महिलांसाठी गृहपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी या वावडी महोत्सव व हिरकणी महोत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन वावडी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

.png)
No comments:
Post a Comment