जाधववाडी (मा) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ माढा यांचे संयुक्त विद्यमाने जाधववाडी (मा) येथे कायदेविषयक शिबिर पार पडले.माढा न्यायालयाचे कनिष्ट स्तर सहदिवाणी न्यायाधिश वाय.एस.आखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न झालेजाधववाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या या शिबीरास महिला नागरिकांनी उत्स्फूर्त पणे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी न्या.आखरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे,बालकांविषयी कायदे, महिलांविषयी यासह विविध कायद्याची माहिती देऊन कायद्याचे महत्व अगदी सोप्या भाषेत मांडले. यावेळी सरकारी वकील अॅड.विशाल सक्री, अॅड.पांडूरंग खोत, अॅड.रत्नप्रभा जगदाळे यांनी देखील कायदेविषयक मार्गदर्शन केले.नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची न्यायाधिश व वकिलांनी समर्पक उत्तरे दिली. शिबीरावेळी जाधववाडीचे सरपंच राहूल जाधव,माढा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.ए. एस कुलकर्णी,अॅड.गणेश भुक्तर, शिवाजी भाकरे,चंद्रकांत कन्हेरे,आशा ढावरे,युवराज परांडे, अर्जून चवरे,मारुती जाधव,विठ्ठल जाधव यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.नवनाथ तांबिले यांनी तर आभार अॅड. सागर कन्हेरे यांनी मानले..
0 Comments