राष्ट्रीय खेळ दिना निमित्त विद्यार्थ्यांना किटचे वाटप
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):-.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालय येथे राष्ट्रीय खेळ दीन वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला.
हॉकी या खेळामध्ये पहिल्याच मॅच मध्ये तीन गोल करणारे, ऑलम्पिक च्या मॅचेस मध्ये एकूण 35 गोल करणारे, इंटरनॅशनल मॅचेस मध्ये 400 पेक्षा अधिक हॉकीचे गोल करणारे तर आपल्या संपूर्ण हॉकी स्पर्धेच्या कारकिर्दीमध्ये 1000 पेक्षा अधिक गोल करणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस व "राष्ट्रीय खेल दिवस" च्या निमित्ताने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, क.तडवळे तील खो खो ,कबड्डी, आट्यापाट्या या संघातील विद्यार्थ्यांना कसबे तडवळे गावातील अमर (भैया ) होगले यांनी मुलांच्या संघाला व मुलींच्या संघांला स्पर्धेतील किटचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नलावडे सी.एम,घोडके सर,ठाकरे सर, शिक्षक पठाण सर,माळी सर,चव्हाण सर,आगलावे सर, बेद्रे सर, इत्यादी उपस्थित सर्व शिक्षकांनी गावातील प्रतिष्ठित विशाल जमाले, अमर होगले, ओंकार थोडसरे ,पत्रकार बालाजी भांड या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.श्री अमर होगले यांनी जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते किटचे वाटप केले. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस राष्ट्रीय खेल दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचेच योग साधून आज विविध खेळांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळाच्या किटचे वाटप करण्यात आले.
0 Comments