Ads

Ads Area

बर्ड फोटोग्राफी प्रदर्शनासाठी मिलापचा एचसीजी हॉस्पिटलशी सहयोग

बर्ड फोटोग्राफी प्रदर्शनासाठी मिलापचा एचसीजी हॉस्पिटलशी सहयोग

या प्रदर्शनातून मिळालेले उत्पन्न लहान मुलांवरील कॅन्सर उपचारांना सहाय्य म्हणून दिले जाणार

मुंबई, (कटूसत्य वृत्त):- मिलाप या भारतातील सर्वांत मोठ्या क्राउडफण्डिंग प्लॅटफॉर्मने मुंबईत एक बर्ड फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी एचसीजी (नागपूर) हॉस्पिटलशी सहयोग केला आहे. हे प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. प्रख्यात सायको-आँकोलॉजिस्ट डॉ. सुचित्रा मेहता यांनी त्यांच्या कोस्टा रिका अभियानात काढलेल्या फोटोग्राफ्सचे लक्षणीय कलेक्शन या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. या चाकोरीबाह्य प्रदर्शनातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न कॅन्सरशी सामना करणाऱ्या आणि सध्या नागपूर येथील एचसीजी सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या शूर बालकांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे. 

मुंबईतील वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरीमध्ये हे खिळवून ठेवणारे प्रदर्शन आठवडाभरासाठी आयोजित करण्यात आले आहे. २९ ऑगस्ट रोजी अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या पाहुण्यांमध्ये प्रख्यात मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉ. पूर्वीश पारीख, प्रख्यात फोटोग्राफर आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष अवचट आणि बॉलिवूड अभिनेत्री स्वरूप संपत यांचा समावेश होता. 

डॉ. सुचित्रा मेहता यांच्या चिकित्सक लेन्सद्वारे टिपल्या गेलेल्या फोटोंचा अप्रतिम संग्रह या प्रदर्शनात मांडला गेला आहे. उद्घाटनाच्या दिवशी अनेक उत्साही पाहुण्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात मांडलेल्या आकर्षक प्रतिमांचे सुंदर प्रतिबिंब या पाहुण्यांच्या उत्साहामध्ये दिसत होते. प्रत्येक फोटो डॉ. सुचित्रा मेहता यांच्या कलेची ग्वाही देत होता, उपस्थितांवर या फोटोंनी गारुड केले होते आणि त्यातून विस्मय व प्रशंसेचे वातावरण निर्माण झाले होते. 

सध्या एचसीजी हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी घेणाऱ्या छोट्या अंशने या कार्यक्रमाची उत्कटता वाढवली. अंशच्या उपचारांकरिता मदत मिळवण्यासाठी त्याचे कुटुंबीयही मिलापवर सक्रियपणे निधीउभारणी अभियान राबवत आहेत. एक छोटा कॅन्सर रुग्ण म्हणून अंशने त्याचा स्वत:चा प्रवास सर्वांपुढे मांडला, त्या परिस्थितीतून जाणाऱ्या सर्व मुलांना जाणवणाऱ्या समस्यांवर त्याने प्रकाश टाकला. त्याने मनापासून सांगितलेल्या अनुभवाचा उपस्थितांवर खोल परिणाम झाला. या छोट्या लढवय्यांना त्यांच्या आयुष्यातील भयावह अध्यायातून जाताना आधार, सहानुभूती व अनुकंपा मिळणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यातही याची मदत झाली. 

मिलापचे अध्यक्ष व सह-संस्थापक अनोज विश्वनाथन म्हणाले, “हा विस्मयकारी प्रयत्नाचा भाग होणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंददायी आहे. प्रत्येक मूल हे सुंदर पक्ष्यासारखे असते, कल्पनाशक्ती, चौकसपणा आणि नि:स्वार्थ प्रेमाच्या भव्य पंखांनी ते खुल्या आकाशात भराऱ्या घेत असते. कॅन्सरसारख्या आजारामुळे त्यांचे पंख छाटले जाऊ नयेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक छोट्या कॅन्सर रुग्णाला आधार देण्याची प्रतिज्ञा करत आहोत, जेणेकरून ते त्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे उंच भराऱ्या घेऊ शकावेत.” 

नागपूर येथील एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या सायको आँकोलॉजी विभागाच्या संचालक व प्रमुख डॉ. सुचित्रा मेहता म्हणाल्या, “लहान मुलांमधील कॅन्सरचा वाढता दर चिंताजनक आहे. प्राणघातक आजाराने ग्रस्त असलेल्या या मुलांना एक आशेचा किरण दाखवणे, या लढ्यात ते एकटे नाही आहेत हा दिलासा देणे खूप आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांमुळे या छोट्या रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवण्यात खूप मदत होते आणि मनोधैर्य उंचावणे म्हणजे कॅन्सरविरोधातील लढाई अर्धी जिंकण्यासारखे आहे. या प्रयत्नात आम्हाला मिलापचे सहाय्य आहे, याबद्दल मला आनंद वाटतो.”

या प्रदर्शनातून मिळणारे उत्पन्न श्रम साधना चॅरिटेबल ट्रस्टला दिला जाणार आहे. ही एक ना-नफा तत्त्वावरील संस्था असून, संसाधनांचा अभाव असलेल्या सीमांत समुदायांना मानसिक व आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे. हा संपूर्ण निधी एचसीजी नागपूरमध्ये उपचार घेत असलेल्या बालरुग्णांच्या लाभासाठी वितरित केला जाणार आहे. 

हे ७ दिवसांचे प्रदर्शन ४ सप्टेंबरपर्यंत, सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळात सर्वांना बघण्यासाठी खुले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोस्टा रिकाच्या मिस्टर कौन्सेलर व कॉन्सुल जनरल श्रीमती सोफिया सलास मोंज, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांसारखे अनेक नामवंत या प्रदर्शनाला भेट देतील आणि या कामाला सहाय्य करतील, असे अपेक्षित आहे. 

कॅन्सर रुग्णांना मदत करण्यात मिलाप आघाडीवर आहे. आपल्या विविध क्राउडफण्डिंग उपक्रमांतून प्लॅटफॉर्म वैद्यकीय संकटात, विशेषत: कॅन्सरसारख्या गंभीर संकटात, सापडलेल्या लोकांसाठी पैसे उभे करण्याचा एक विश्वासार्ह व व्यवहार्य पर्याय म्हणून हा प्लॅटफॉर्म ओळखला जातो. कॅन्सरला तोंड देणाऱ्या छोट्या लढवय्यांना मदत करणे संस्थेच्या तत्त्वांनुसार अधिक महत्त्वाचे आहे. हा प्लॅटफॉर्म क्राउडफण्डिंगमधील विश्वासू नाव आहे. कॅन्सर रुग्णांच्या आयुष्यांवर अर्थपूर्ण प्रभाव टाकण्यास हा प्लॅटफॉर्म वापरकर्ते, देणगीदार आणि लाभार्थींना सक्षम करत आहे. 

मिलाप विषयी: 

मिलाप हा व्यक्तिगत व सामाजिक कामांसाठी, विशेषत: आरोग्यसेवा व संबंधित गरजांसाठी, निधी उभा करणारा भारतातील सर्वांत मोठा क्राउडफण्डिंग प्लॅटफॉर्म आहे. सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीपलीकडे असलेला निधी उभा करण्याची क्षमता हा प्लॅटफॉर्म कोणत्याही गरजूला देतो. कॅन्सरवरील उपचार, अवयव प्रत्यारोपण, अपघात यांसारख्या विशेष वैद्यकीय गरजांसाठी किंवा शिक्षण किंवा समुदायाशी निगडित कामांसाठी हा निधी उभा केला जातो. 

मिलापचा देणगीदार समुदाय जगातील १३० देशांमध्ये पसरलेला आहे आणि या समुदायाने भारतभरातील ८०९,०००हून अधिक प्रकल्पांसाठी २३२० कोटी रुपयांहून अधिक निधीचे योगदान दिले आहे. गेल्या १३ वर्षांहून अधिक काळात मिलाप हा भारतातील उदात्त कामांसाठी निधी उभा करण्याचा व योगदान देण्याचा पसंतीचा प्लॅटफॉर्म झाला आहे. 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close