Ads

Ads Area

जिल्हास्तरीय दिव्यांग शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांगानी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

 जिल्हास्तरीय दिव्यांग शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांगानी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने 'शासन दिव्यांगाच्या दारी' उपक्रमांतर्गत दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या शिबिरास जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगानी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले

. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित दिव्यांग शिबिर पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, शासकीय वैदकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी  नगरपालिका आशिष लोकरे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह दिव्यांग संघटनाचे प्रतिनिधी व दिव्यांग बांधव तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की,  दिव्यांगासाठी सोलापूर शहरात जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव या शिबिरास उपस्थित राहण्यासाठी समाज कल्याण विभागाने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा दिव्यांगाना उपलब्ध करून द्याव्यात. अपंगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तसेच ज्या दिव्यांगाकडे अपंगत्व  प्रमाणपत्र आहे त्यांनी व अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगानी ही या शिबिरास उपस्थित राहण्याबाबत दवंडी देऊन प्रत्येक दिव्यांगापर्यंत माहिती पोहोचवावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

            दिव्यांग यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी समाज कल्याण विभागाने बसेसची व्यवस्था करून  व्हीलचेअरची ही व्यवस्था करावी. दिव्यांगासाठी असलेल्या सर्व योजनांची माहितीचे एक बुकलेट तयार करून त्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचतील व त्या योजनांचा लाभ त्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाच्या वतीने दिव्यांगासाठी असलेल्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावावेत व पात्र लाभार्थ्यांकडून संबंधित योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी सुचित केले.

             जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील दिव्यांगाची नोंद करणे तसेच शिबिरासाठी दिव्यांगांना माहिती देणे यासाठी ग्रामसेवकाच्या माध्यमातून सूचना पोहोचवण्यात येतील. त्याचप्रमाणे शिबिराच्या ठिकाणी दिव्यांगाना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

            प्रारंभी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. खमितकर यांनी  दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शासन दिव्यांगाच्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय दिव्यांग सोलापूर येथील नॉर्थ कोर्ट येथे घेण्याचे नियोजित असल्याची माहिती दिली. या शिबिरास जिल्ह्यातील आठ ते दहा हजार दिव्यांग लाभार्थी उपस्थित राहतील त्यांच्यासाठी राज्य महामंडळाच्या 60 बसेसची व्यवस्था करण्याचे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी दिव्यांगाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे 28 स्टॉल लावण्यात येणार असून या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची माहिती तसेच याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

             यावेळी दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधींनीही दिव्यांग शिबिराच्या अनुषंगाने सूचना मांडल्या. यामध्ये दिव्यांगासाठी येणे व जाण्याची योग्य व्यवस्था करणे, शिबिराच्या ठिकाणी आलेल्या दिव्यांगाना शासकीय योजनेचा लाभ देणे, प्रलंबित असलेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणे आदी मागण्या केल्या.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close