Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

 माढ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

सततच्या पावसात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अनुदान अद्याप न

 मिळाल्याने शंभु साठे च्या नेतृत्वाखाली आंदोलन 


माढा (कटूसत्य वृत्त):- सततच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकर्याच्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचे अनुदान अद्याप न मिळाल्याने शंभु साठे च्या नेतृत्वाखाली मााढ्यात शेतकर्यानी रास्ता आंदोलन केले.

माढा शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळी १० वाजता आंदोलनास सुरूवात झाली.ऑक्टोबर २०२२ मध्ये माढा  तालुक्यात सततचा   पाऊस झाला होता.या पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.बार्शी सह अन्य तालुक्यांना भरपाई अनुदान आलेले आहे.मात्र माढा तालुक्यासाठीचा निधी न आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.एकीकडे ऑगस्ट महिना संपला तरी पावसाने हजेरी लावली नसल्याने उभी पिके पाण्या अभावी जळत आहेत.तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.आर्थिक पेच प्रसंगात अडकलेल्या शेतकऱ्यांना  सततच्या पावसाचे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांची परवड थांबणार आहे. येत्या १५ दिवसांत नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास कृषी मंत्र्याच्या घरा समोर ठिय्या  आंदोलन करण्याचा इशारा शंभु साठे यांच्या कडुन देण्यात आला आहे.नायब तहसीलदार विजय लोकरे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले. आंदोलनात बबन पाटील,संदीप शिंदे,रानबा कदम,आबा साठे,मालकोजी आडकर,तुषार पाटील,दीपक गव्हाणे,ओकांर चव्हाण,राहुल मस्के,आदित्य लवटे,शरद भांगे,जितू जमदाडे,शरद हांडे,स्वप्निल शिंदे,रणजीत भांगे,संदीप साठे,गौतम शिंदे,अक्रम कुरेशी, आकाश कांबळे  यांचेसह  शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते

 १५ कोटी ८२ हजारांचा प्रस्ताव शासनदरबारी -
माढा तालुक्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या सततच्या पावसाने १५ हजार ९४२ शेतकऱ्यांचे १५ कोटी ८२ हजार ७०५  रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रस्ताव तत्कालीन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे  प्रस्ताव पाठवला होता.मात्र अद्याप नुकसान भरपाई चे अनुदान आलेले नसुन शासनदरबारी प्रस्ताव अडकलेला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments