Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात "लीन स्टार्ट-अप अँड मिनिमम विअबल प्रॉडक्ट/ बिझनेस " यावर व्याख्यान संपन्न

 सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात "लीन स्टार्ट-अप अँड

 मिनिमम विअबल प्रॉडक्ट/ बिझनेस " यावर व्याख्यान संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी लीन स्टार्ट-अप अँड मिनिमम विअबल प्रॉडक्ट/ बिझनेस " यावर व्याख्यान संपन्न झाले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागातील स्टार्ट-अप ची प्रारंभिक सुरवात आणि त्यासाठी उत्पादन व्यवसाय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुनील शाखपूरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी आय. आय. सी. सेल, सी.आर.टी .डी.फंडींग यांचा समन्वय साधून या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांना सांगितली. यामध्ये कोअर विभागांतील विद्यार्थ्यांना उद्योगाची सुरवात करण्यासाठीच्या संधीची माहिती सांगितली. प्रा. सुनील शाखपुरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील गोष्टींचा विचार करून नविन कल्पकता कशी करता येईल याची माहिती दिली व ती कल्पकता व्यवहारात आल्यावर काय काळजी घ्यायला हवी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता दुधभाते यांनी केले तर व्यवस्थापन रामपुरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, विभागप्रमुख डॉ.विजयकुमार बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments