Hot Posts

6/recent/ticker-posts

बीआरएसच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी दशरथ गोप

 बीआरएसच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी दशरथ गोप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्यात पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापूरात विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वी पदमशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता,तेलंगणा चे मुख्यमंत्री केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून गोप यांच्यावर सोलापूर शहर अध्यक्ष पद दिले असून मंगळवारी केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या निवडीचे पत्र जाहीर केले असून,निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अध्यक्ष पद दिल्याबद्दल मुख्यमंत्री केसीआर यांचे आभार व्यक्त करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण सोलापूरच्या विकासासाठी काम करणार असून तेलंगणा पॅटर्न सोलापूरात राबविण्यासाठी आपण बीआरएस च्या माध्यमातून प्रयत्न करणार असून सोलापूरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे दशरथ गोप म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments