वै. उदयकुमार शिखरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री समर्थ दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव वै. उदयकुमार शिखरे यांची पुण्यतिथी श्री समर्थ विद्यामंदिर येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अरुण शिखरे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, सुधा शिखरे, ओम शिखरे आदी उपस्थित होते. यावेळी अमोल तिपणे व शीला शिंदे यांनी उदय शिखरे यांच्याविषयी मनोगत आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुथम्मा भंडारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभावती कंडरे यांनी केले. यावेळी परमेश्वर कलशेट्टी, मोहिनी गायकवाड, महादेव चौरे, दीपाली शहाणे, श्रुती शिखरे आदी शिक्षक उपस्थित होते.
0 Comments