अभिजित गायकवाड यांच्या अचानक जाण्याने मोहोळ तालुक्यात हळहळ
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील अभिजित अशोक गायकवाड यांचे मंगळवार दिनांक 29/08/2023 रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक 31 ऑगष्ट रोजी सकाळी 7:00 वाजता राहत्या घराजवळ गायकवाड फार्म सोलापूर रोड येथे आहे. ते मृत्युसमयी त्यांचे वय 37 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. ते मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते कौशिक गायकवाड यांचे पुतणे लागत होते.
अभिजित गायकवाड यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मोहोळ तालुक्यात व परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments