आशा मराठी विद्यालयात रक्षा बंधनाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील आशा मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यानी बांधल्या, नवीन कपडे परिधान करून हातात राखी घेऊन ही चिमुरडी शाळेत दाखल झाली, आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून शैक्षणिक साहित्य घेऊन मुलं आली आणि आनंदी वातावरणात रक्षा बंधन पार पडला. बालमनावर संस्कार होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे मत मुख्याध्यापिका सौ तस्लिमबानो पठाण यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम गायकवाड, गंगाधर स्वामी, विरभद्र यादवाड, गजानन पैलवान, लिंगय्या मेनकुदळे, चंद्रकांत शिरगापूरे, सौ पुष्पा बबलादे, सौ मुळे आदी उपस्थित होते.
0 Comments