सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या उपस्थितीत निमगाव चा वावडी व हिरकणी महोत्सव उत्साहात साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- निमगाव वावडी महोत्सव संयोजन समितीने आयोजित केलेला निमगाव वावडी आणि महिलांसाठी आयोजित केलेला हिरकणी महोत्सव प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या उपस्थितीत रविवार दि 27 ऑगस्ट रोजी निमगाव ता माळशिरस येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी सोलापूर जिल्ह्यासह पुणे ,सातारा सांगली आदि जिल्ह्यातील वावडी प्रेमींनी आपला सहभाग नोंदविला होता या वावडी महोत्सव व हिरकणी महोत्सवचा बक्षीस वितरण समारंभ सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील, हिंदुराव माने पाटील काँग्रेस नेते ॲड एम एम मगर, डॉ राजीव राणे ,डॉ तानाजीराव कदम ,डॉ श्रीकांत देवडीकर, डॉ श्रद्धा जवंजाळ, डॉ मानसी देवडीकर ,डॉ राहुल जवंजाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब देशमुख ,ॲड सोमनाथ वाघमोडे, ॲड जी पी कदम ,माजी उपसभापती किशोर सूळ, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, बाळासाहेब सरगर ,संजय देशमुख, उत्तमराव माने शेंडगे ,अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे, राजन जबडे, सा बां विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील ,निमगाव चे सरपंच सुभाष साठे ,उपसरपंच नंदकुमार पाटील , हनुमंत पवार ,बबनराव जाधव ,महादेव मगर संचालक हरिभाऊ मगर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तीन गटात झालेल्या या स्पर्धेच्या मोठ्या गटातील शिवतांडव ग्रुपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर द्वितीय क्रमांक होय हिंदूच तृतीय मराठा साम्राज्य व होलार गल्ली उत्तेजनार्थ हमारा कल बेटी और जल व क्रांतीसुर्य माळी ग्रुप विजेते ठरले मध्यम गटात प्रथम क्रमांक शिवप्रेमी चांद्रयान तीन द्वितीय विराज मगर तृतीय प्रसाद राऊत तर उत्तेजनार्थ नेहरूनगर बॉईज ग्रुपला देण्यात आले तर लहान गटात प्रथम मावळा ग्रुप द्वितीय संस्कार गाडेकर तृतीय विशाल तोरणे तर उत्तेजनार्थ ओम गाडेकर व पृथ्वीराज खंडागळे यांना विभागून देण्यात आले यावेळी काँग्रेस नेते ॲड एम एम मगर व जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील मिलिंद गुणाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
निमगाव वावडी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी महोत्सवात जवळपास 400 महिलांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत माधुरी मगर, साधना कदम व सपना मगर यांना अनुक्रमे पैठणी मिक्सर व कुकर अशी बक्षिसे सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते देण्यात आली स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच महिलांना संयोजन समितीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
0 Comments