सीईओ मनीषा आव्हाळेनी कामचुकार कर्मचाऱ्यांना घेतले फाईलवर...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

सीईओ मनीषा आव्हाळेनी कामचुकार कर्मचाऱ्यांना घेतले फाईलवर...!

 सीईओ मनीषा आव्हाळेनी कामचुकार कर्मचाऱ्यांना घेतले फाईलवर...! 

जि.प.चे कर्मचारी सलाइनवर..!! 


सोलापूर (दादासाहेब निळ कटूसत्य वृत्त):- मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची खरी ओळख..! शेतकऱ्याचे मंदिर म्हणून जिल्हा परिषदेला ओळखलं जातं परंतु याच मंदिरामध्ये काम करणारे कर्मचारी  किंवा अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते.  शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केल्यानंतर ते तुरुंगात सडू लागले आहेत. आरोग्य विभाग, कृषी विभाग ,समाज कल्याण विभाग, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावल्याचे दिसून येत आहे.  तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर म्हणावा तसा वचक ठेवता ' न ' आल्यामुळे त्यांच्या कार्य काळामध्ये भ्रष्टाचाराची साखळी मोठ्या प्रमाणात तयार झाल्याचे बोलले जात आहे.  दिलीप स्वामी यांच्या बदलीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर आपल्या कर्तव्याशी इमान राखून त्या जिल्हा परिषद स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालय कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेतच कार्यालयामध्ये उपस्थित राहावे.  कार्यालयीन वेळेतच कामकाज करावे.  कार्यालयीन  वेळेच्या पूर्वी येऊ नये व कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात थांबू नये. त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी विभाग प्रमुखाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही कार्यालयात उपस्थित राहू नये असे आदेश दिल्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सध्या शिस्त येण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.  कामात अनियमितता, दप्तर दिरंगाई चा ठपका ठेवत जलजीवन मिशन विभागात काम करणाऱ्या दोन लिपिका वर मनीषा आव्हाळे यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. भ्रष्टाचाराची पाळीमुळे मुळापासून नष्ट करण्याची गरज सध्या सर्वच क्षेत्राला असून जिल्हा परिषद ही फार मोठ्या भ्रष्टाचारामुळे नेहमीच चर्चेत असते.  भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून जिल्हा परिषदेची ओळख या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेली आहे. गले लठ्ठ पगार घेऊन सुद्धा चिरीमिरी घेतल्याशिवाय फाईलला हात न लावणारे हे महाभाग ...! 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जलजीवन मिशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर आ.  सुभाष देशमुख आ.  सचिन कल्याण शेट्टी आ.  समाधान आवताडे यांनी घातली होती.  तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार मनीषा आव्हाळे यांनी घेतल्यानंतर त्यांनी जलजीवन मशीन अंतर्गत येणाऱ्या कामांना नियोजनबद्ध आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच हे दोन मासे गळाला लागल्याचे बोलले जात आहे. 
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी अशाच प्रकारे जिल्हा परिषदेतील काम चुकार आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अथवा अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवायाचे सत्र चालू ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. जनतेची काम आणि सेवा करण्यासाठीच शासनाने आपली नियुक्ती केली आहे याचाच विसर या कर्मचाऱ्यांना पडल्यामुळेच ते कामचू कार आणि भ्रष्टाचाराच्या यादीत जाऊन पडतात.  ध्याच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनू लागल्यामुळे शासकीय यंत्रणेवरील असणारा विश्वास अशा कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे संपुष्टात येऊ लागलेला आहे.  जिल्हा परिषदेत येणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची कामे वेळेवर आणि चिरीमिरी न घेता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही.  कर्तव्यदक्ष आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई करणारे अधिकारी जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मंदिरात आहेत तोपर्यंत तरी किमान भ्रष्टाचार थांबेल. 
नागरिकांनी सुद्धा सजग होऊन भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुढे येणं काळाची गरज आहे. 
भ्रष्टाचार करणाऱ्या इतकाच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा सुद्धा तितकाच दोषी समजला पाहिजे. 
जगा आणि जगू द्या अशा प्रकारचं जिल्हा परिषदेतील सूत्र कधी थांबणार...? 
शेतकऱ्याच्या मंदिरात सर्वसामान्य शेतकऱ्याला कधी न्याय मिळणार...? 
कारवाईचे सत्र किती दिवस चालणार..? 
पैसा घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. 
या फायली पैसा विना कधी पुढे सरकणार...? 
सर्वसामान्य नागरिकांतून मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages