खा महास्वामींच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी पुन्हा दक्षता पथक! साक्षीदारांचे जबाब अन् कागदपत्रांची होणार फेरचौकशी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची टर्म एप्रिल २०२४ मध्ये संपणार आहे. पण, निवडणुकीनंतर त्यांच्यामागे बनावट जातवैधता प्रमाणपत्राची चौकशी लागली होती. सोलापूरच्या जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र बनावट ठरविल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावर खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरचौकशी सुरु झाली असून त्यासाठी पुन्हा दक्षता पथक नेमले जाणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत डॉ. महास्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख ५८ हजार मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश यांचाही या निवडणुकीत पराभव झाला होता. विजयाचा आनंद साजरा करतानाच सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड यांच्यासह इतर तिघांनी खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडील जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार जात पडताळणी समितीकडे केली होती.
त्यानंतर समितीने कागदपत्रांची पाहणी करून दक्षता पथकाद्वारे त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. सखोल चौकशीअंती खासदारांकडील प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने दिला. त्याचवेळी अक्कलकोट तहसीलदारांमार्फत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार कारवाई झाली. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यावेळी खासदारांना पोलिसांत हजेरी देखील द्यावी लागत होती. पण, उच्च न्यायालयात धाव घेत त्यांनी आम्हाला समितीने म्हणणे मांडण्यासाठी व कागदपत्रे (पुरावे) सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याप्रकरणी याचिका दाखल केली.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने पडताळणी समितीला आदेश करीत त्या प्रमाणपत्राची फेरचौकशी करून निकाल द्यावा, त्याचा अहवाल आम्हाला सादर करावा, असे सांगितले. आता त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे.
जात पडताळणी समितीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या फेरचौकशीची कार्यवाही सुरु केली आहे. पण, खासदारांच्या बाजूने वेळ मागितला जातोय, अशी स्थिती आहे. १७ ऑगस्टला सुनावणी होती, पण पूर्ण होऊ शकली नाही. आता पुढील तारीख निश्चित नाही, पण तक्रारदार व खासदारांना कळवून दक्षता समिती नेमली जाईल, असे समितीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

.png)
No comments:
Post a Comment