माजी आमदार रमेश कदम यांना जामीन झाल्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाची बदलणार राजकीय समीकरणे ठाणे कारागृहाच्या बाहेर जल्लोषात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

माजी आमदार रमेश कदम यांना जामीन झाल्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाची बदलणार राजकीय समीकरणे ठाणे कारागृहाच्या बाहेर जल्लोषात स्वागत

 माजी आमदार रमेश कदम यांना जामीन झाल्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाची बदलणार राजकीय समीकरणे ठाणे कारागृहाच्या बाहेर जल्लोषात स्वागत


कुरुल (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवुन घोटाळा केल्याचा ठपका ठेवत गैरव्यवहार प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार रमेश कदम यांना ८ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. पाच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व पोलिसठाण्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जामीन मिळाल्यानंतर माजी आ.कदम यांची ठाणे कारागृहातुन रविवारी सुटका करण्यात आली  कार्यकर्त्यांनी व कुटुंबीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या जामीनामुळे मोहोळ तालुक्यातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे बळ संचारले असून मोहोळ विधानसभा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे व्यक्त केली जात आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठ वर्षापासून तुरुंगात असलेले मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांना दाखल असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर झाल्याने त्यांची रविवारी ठाण्याच्या कारागृहातून सुटका करण्यात आली. रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून २०१४ मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघात निवडून आले होते. काही महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी मतदारसंघात मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता, आधी रस्ते - मग वाळू उपसा अशा अनेक योजना सुरू केल्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आले होते. त्यांच्या धडाकेबाज कामामुळे लोकांनी त्यांना 'सिंघम आमदार' अशी बिरूदावली दिली होती. दरम्यान सन २०१६ मध्ये त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक झाली व तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर ते सन २०१९ मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढले, ते तुरुंगात असतानाही जवळपास २५ हजार मते त्यांना मिळाली होती. न्यायालयात जामीन झाल्याने त्यांची रविवारी सुटका होणार असल्याची बातमी प्रसार माध्यमांवर झळकताच मोहोळ तालुक्यासह राज्यभरातील रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे गाठले. त्यांची कारागृहातून मुक्तता केल्यानंतर 'सिंघम रिटर्न' म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान त्यांच्या जामीनामुळे प्रस्थापितांना धक्का बसला असून रमेश कदम यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आह

यावेळी उमेश कदम, आबा कांबळे, सागर माने, राम कोरके, शशिकांत कसबे, बालाजी महानवर, सुधीर खंदारे, नितीन महानवर, वेदांत कांबळे, अजिंक्य गायकवाड, विठ्ठल सरवदे, जयपाल पवार आदींसह माजी आमदार रमेश कदम युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️चौकट :
 तब्बल आठ वर्षानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार रमेश कदम हे पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात कामाला लागतील का...? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जात आहे. आणि जर का ते सक्रिय झाले तर मोहोळ विधानसभेच्या राजकारणात काही निर्णायक घडामोडी नक्कीच घडतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आ. कदम यांचा एक वेगळा पॅटर्न चालेल अशी चर्चा यनिमित्ताने होत असून ते  कोणत्या पक्षात जातील? कि राष्ट्रवादीच्याच माध्यमातून पुढे येतील हा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages