सावळेश्वर येथे भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा सन्मान बाईक रॅली...!
सावळेश्वर ( कटू सत्य): -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना आज सावळेश्वर येथे भारतीय जनता पार्टी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने 'तिरंगा सन्मान बाईक रॅली', x वृक्षारोपण, 'मेरी मिट्टी मेरा देश' - भुमातेला वंदन करून पंचप्राण शपथ, पंचक्रोशितील माजी सैनिकांचा आदर सन्मान व विभाजिका विभिषिका - फाळणी संदर्भातील
चित्रफीत दाखवण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष शशिकांत दादा गावडे, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष आनंद गावडे यांनी महा रॅलीची उत्कृष्ट तयारी केली होती.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण , लोकसेवक तथा भाजपाचे नेते संजय क्षीरसागर आणि भाजप शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यावेळी कार्यकर्त्यांना देशभक्तीच्या भावना तरुणांमध्ये जागा करण्यासाठी आपल्या उगवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व आदरणीय माजी सैनिक सुरेश भाऊ गावडे, विरवडेचे मा. सैनिक धर्मराज गवळी काका, अर्जूनसोंडचे मा.सैनिक कृष्णाजी भोसले काका, मोहोळचे मा. सैनिक नागेशजी क्षीरसागर यांचा आदर सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख सुनील दादा चव्हाण, लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर, मोहोळ शहराध्यक्ष सुशीलभैय्या क्षीरसागर, या अभियानाचे जिल्हा संयोजक तथा सरचिटणीस रमेशजी माने, सरचिटणीस महेशजी सोवनी, तालुका उपाध्यक्ष देशपांडे जी, नितीनजी सोनटक्के, माजी उपसरपंच प्रदिपजी आमले, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नागेशजी क्षीरसागर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेशजी झाडे, गुरुराजजी तागडे, सह संयोजक सुशिलजी मोटे, विष्णू चव्हाण, अपंग सेल तालुकाध्यक्ष आनंद गावडे, ग्रामविकास व पंचायतराज तालुका सह संयोजक जांबुवंत उराडे, ग्राम पंचायत सदस्य दादाराव लांडगे, माजी ग्रा.पं.सदस्य सीताराम गुंड, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पप्पू लांडगे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काकडे आदींसह सर्व जिवाभावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व तरुण सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment