स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शाहिरी जलसा जागर कार्यक्रम संपन्न!
त्या अमर हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही - कॉ.आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शूर वीर अमर हुतात्म्यांनी प्राणांची आहूती दिले त्याच जोडीला कामगार शेतकऱ्यांनी सुद्धा रक्त सांडले. रक्तरंजित क्रांती करून कामगार कायदे अस्तित्वात आणले मात्र आजच्या राज्यकर्त्यांनी ते पायदळी तुडवत आहेत.धर्मांधता आणि सांप्रदायिक ध्रुवीकरण करत अराजकता माजवत आहेत. याला राष्ट्रीय एकात्मतेच्या जोरावर रोखले पाहिजे.आम्ही कदापीही त्या अमर हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही हा निर्धार आपण केला पाहिजे असा शब्दांत स्वातंत्र्य सैनिकांना अमर हुतात्म्यांना स्मरण करत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले
सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स च्या वतीने 14 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजता महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शाहिरी जलसा जागर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
आज देशात माणसांच्या वैयक्तीक जीवनात धर्माचा आणि राजकीय शक्तींचा शिरकाव वाढला असून याला सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन आणि परिवर्तन करण्याची गरज आहे.म्हणून शाहिरी जलसा जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम सिटू ने हाती घेतला आहे. धर्मनिरपेक्ष, जातीविरहित भारत घडवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत.अशा एम.एच.शेख यांनी शब्दांत शुभेच्छा दिले.
यावेळी व्यासपीठावर सिटू चे नेते माजी नगरसेविका कॉ.कामिनी आडम, कॉ.नसीमा शेख, कॉ.युसूफ मेजर, अँड.अनिल वासम आदींची उपस्थितीहोती.
प्रजा नाट्य मंडळ कलापथकाचे शाहीर प्रशांत म्याकल, अनिल वासम ,विशाल पवार, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर, नागेश विटकर अन्य कलाकारांनी शहीद झालेल्या शूरवीरांना वाहू पुष्पांजली शीरवीरांना, ऐ भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, नफरत छोडो भारत जोडो भारत के रखवालो, पुराण पोथी कुरान गीता बायबल पढणेवालो, कुणी आला अंगावर घ्यायचा शिंगावर नाही सोडायचा राडा करायचा रे बंधू राडा करायचा अशा अनेक देशप्रेम व क्रांतिगीते सादर करून वातारावरणात स्फुल्लिंग चेतावले.त्याचबरोबर सादिक सिद्दीकी प्रेजेंट्स, जलवा म्युझिकल और्केस्ट्रा,सोलापूर . गायक सादिकभाई सिद्दीकी, रहिमानभाई शेख,डी.के.चाचा, साळुंखे, सदाबहार स्टुडिओचे श्री कनकी सर, विठ्ठल झिपरें, गायिका के.अनिता, हकिकत न्युज चॅनल चे निवेदक मुदस्सर बिराजदार आदींनी गीत गायन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिटू चे सर्व पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड. अनिल वासम यांनी केले.

No comments:
Post a Comment