आ बबनदादा शिंदे यांचा अंजनगाव खेलोबा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

आ बबनदादा शिंदे यांचा अंजनगाव खेलोबा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 आ बबनदादा शिंदे यांचा अंजनगाव खेलोबा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

माढा (कटूसत्य वृत्त):- मागील अनेक वर्षांपासून अंजनगाव खेलोबा ते तांबोळी वस्ती या चार किमी अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी ग्रामस्थांची मागणी होती.या मागणीचा सकारात्मक व गांभीर्याने विचार करून आमदार बबनदादा शिंदे यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यमान उपसरपंच भागवत चौगुले व नसीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ग्रामस्थ,महिला व शाळेसाठी ये-जा करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.ही बाब स्थानिक नेतेमंडळी व ग्रामस्थांनी आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.या मागणीचा विचार करून आमदार बबनदादा शिंदे यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करून हा भरीव निधी मंजूर केला आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी माजी सरपंच भागवत चौगुले, युवानेते प्रदीप चौगुले,मोहसीन तांबोळी,महेबुब तांबोळी,चांद तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages