सोलापुरात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी...! शासनाच्या विरोधात पत्रकारांची घोषणा बाजी ...!!
सोलापूर( कटू सत्य वृत्त): -सामान्यांचे आणि गरिबांचं सरकार म्हणून सातत्याने गुळमट भाषण करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या जळगाव तालुक्यातील पाचोरा येथील आमदाराने येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आणि आमदार किशोर पाटील यांच्या ठेकेदार रुपी गुंडांनी या पत्रकारावर निर्गुण आणि अमानुष हल्ला केला. आणि तरीसुद्धा पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी राजकीय दबाव पोटी होत नसल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी राज्यभरात पत्रकार आंदोलन करत आहेत.
त्याच धर्तीवर सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळील पूनमगेट येथे सुद्धा पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत शासनाच्या विरोधात पत्रकारांनी निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसांना मत मांडण्याचा अधिकार नाही का..?
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे आमदाराच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सुद्धा पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्याऐवजी नुसताच कारवाईचा आणि तपासाचा बाऊ करत असल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संपली की काय असेच म्हणावे लागत आहे.
कायदा हातात घेणाऱ्या आमदार किशोर पाटील ना हे सामान्यांचे सरकार कोणती शिक्षा करणार ..?
लोकशाहीमध्ये आपलं मत मांडणाऱ्या पत्रकाराला हे सरकार संरक्षण देणार का..?
हे प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने न घेतल्यास राज्यव्यापी पत्रकार संघटना पुढच्या काळात उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज राज्यभारतील पत्रकारांनी वज्रमूठ आवळून या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे.
पुनम गेट येथे सोलापुरातील सर्व पत्रकार संघटना डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया यांचे प्रतिनिधी पूनम गेट येथे जमून पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी करून पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार भगवान परळीकर, दशरथ वडतीले, पी.पी कुलकर्णी, विजयकुमार बाबर, पांडुरंग सुरवसे, विनायक होटकर, अखलाक शेख , अमोल व्यवहारे, विशाल भांगे तसेच डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडियाचे आप्पा बनसोडे , लक्ष्मण शिंदे , दीपक सोमा, सलाउद्दीन शेख, प्रशांत कटारे, परशुराम कोकणे, मनोज हुलसुरे, विकास कस्तुरे , नागेश दंतकाळे, अकबर बागवान , योगेश कल्याणकर , योगेश तुरेराव, वैभव गंगणे, बाळासाहेब वाघमोडे, शहानवाज शेख, इम्रान सगरी, अनिल कांबळे , आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment