माढ्यात रेशन धान्य घोटाळा उघड,सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी केला पर्दाफाश,धान्य गोदामात पोत्यात कमी धान्य भरुन रेशन दुकांनाना केले जाते धान्य वाटप, भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाईची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

माढ्यात रेशन धान्य घोटाळा उघड,सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी केला पर्दाफाश,धान्य गोदामात पोत्यात कमी धान्य भरुन रेशन दुकांनाना केले जाते धान्य वाटप, भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितावर कठोर कारवाईची मागणी

 माढ्यात रेशन धान्य घोटाळा उघड,सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी केला पर्दाफाश,धान्य गोदामात पोत्यात  कमी धान्य भरुन  रेशन दुकांनाना केले जाते धान्य वाटप, भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितावर  कठोर कारवाईची मागणी 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून देण्यात येणाऱ्या (रेशन धान्य वाटपात) शिधा वाटपात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याची धक्कादायक बाब स्वातंत्र्य दिनीच समोर आली आहे. धान्य  गोदामातील जुनी तफावत काढण्यासाठी हा घोटाळा करण्यात आल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी काय कारवाई करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याचा पर्दाफाश लोंढेवाडी गावात धान्य वाटप करताना माढ्यातील सामाजिक कार्यकर्ते शंभु साठे यांनी केलाय. पुरवठा विभागातून धान्य  घेऊन जाणाऱ्या वाहनातील पोत्यातील  धान्याची वजनाची तपासणी केली असता. ५० किलो च्या गव्हाच्या पोत्यात प्रत्येकी १० किलो कमी तर  तांदुळ ३ ते ५ किलो कमी निघाला.गाडीतील प्रत्येक पोत्याची शंभु साठे यांनी मोजमाप करुन  तपासणी केली त्यात   गहू २ क्विंटल ९० किलो  तर तांदुळ  २ क्विंटल कमी आढळला.व्हिडीओ सह हा प्रकार  शंभु साठे यांनी तहसीलदार व पत्रकारांसमोर मांडला.लोंढेवाडीचे ग्रामसेवक श्री गव्हाणे यांनी देखील रेशन दुकानदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धान्य गाडीत कमी आल्याचा  पंचनामा केला आहे. पावती वर ५० किलोचे वजन असताना प्रत्यक्षात मात्र ४० किलोच धान्य निघाल्याने रेशन दुकानदारांना देखील मोठा फटका आढळला.धान्य गोदामात पोती भरताना धान्य कोणी भरले ? तालुक्यातील अश्या १७० पैकी  किती रेशन धान्य  दुकानांना कपात करुन  माल वाटप झाला हा संशोधनाचा विषय असुन वरिष्ट अधिकाऱ्यांच्या  चौकशीतून यातुन मोठा धान्य   घोटाळा समोर येणार आहे.तालुक्यातील रेशन धान्य दुकानात असाच माल वाटला असल्याची  शक्यता  वर्तवली जात आहे.
चौकट) शासकीय गोदाम पालकाची बदली मात्र चार्ज सोडलाच नाही- माढ्यातील पुरवठा विभागातील शासकीय गोदाम पालक श्री.कदम यांची बदली झालेली आहे.मात्र त्यांनी चार्ज सोडलेला नाही.गोदामातील जुनी धान्याची  तफावत काढण्यासाठी हे कृत्य(घोटाळा) केल्याचा दाट शक्यता वर्तविण्यात येत असुन त्या दृष्टीने चौकशी व तपास केला जाणार आहे.कदम हे १५ ऑगस्ट ला उपस्थितीत होते.त्यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष नव्हते का ? या घोटाळ्याची कल्पना त्यांना आहे.असे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
चौकट) किती धान्य येते..किती राहते ?-शासकीय धान्य गोदामात किती धान्य येते आणी किती  शिल्लक किती राहते.गोदामातील धान्याच्या पोत्याचे वजन करण्याचे व भरण्याचे काम  कोण कर्मचारी  करतात ? याची सखोल चौकशी केल्यावरच  खरे गौडबंगाल समोर येणार आहे. कोट) तालुक्यातील १७० रेशन  धान्य दुकानात असा कमी माल वाटप केला आहे.हे माझे स्पष्ट मत असुन  गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचे काम धान्य गोदामातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून  झाले आहे.लोंढेवाडी गावात मी स्वतःह जाऊन हा प्रकार समोर आणला आहे.या धान्य घोटाळ्याच्या प्रकरणातील संबधित  सर्वांवर कारवाई ची मागणी प्रश्नी आंदोलन करणार आहे-शंभु साठे,सामाजिक कार्यकर्ते माढा  कोट) हा प्रकार फार चुकीचा असुन या कृत्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांस पाठिशी घातले जाणार नसुन कठोर कारवाई केली जाईल.चौकशी अहवाल मागवला असुन मी स्वतःह धान्य गोदामात जाऊन पाहणी करणार आहे-विनोद रणवरे  तहसीलदार माढा 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages