भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांच्या नांव नोंदणीसाठी विशेषअभियान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाही व्यवस्थेत मतदार हा महत्वाचा घटक आहे. कोणताही मतदार हा मतदान नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला असून, भटक्यामुक्त जमातीमधील मतदारांची नांव नोंदणी करणे तसेच विविध प्रकारचे दाखले , आधारकार्ड, रेशनकार्ड, देण्याबाबत विशेष आभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी कुमार आशीर्वाद,यांच्या आदेशान्वये तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियाना अंतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात 31 ऑगस्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यात यादी तयार करणे व फॉर्म भरून घेणे इत्यादी कामकाज पार केले जाणार आहे.प्राप्त अर्जावर कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 11 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2023 या कालावधीत वंचित घटकाचे शिबीर आयोजित करून प्रमाणपत्र व कार्ड आदी वाटप करण्यात येणार आहे.
भटक्या विमुक्त जामातीचे घटकांसाठी कार्य करणाऱ्या सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह वंचित भटक्या विमुक्त जमातीतील नागरीकांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करून सदर अभियानांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार सैपन नदाफ यांनी केले आहे.
0 Comments