प्रमाणित व अधिकृत वजन काट्यांचाच वापर करावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वैधमापनशास्त्र अधिनियम 2009 मधील तरतूदीनूसार पडताळणी व मुद्रांकन न झालेले व सोबत मूळ पडताळणी प्रमाणपत्र नसलेले इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणे हे अप्रमाणित असून त्यांचा वापर करणे हा बेकायदेशीर आहे. सर्व उपयोगकर्ते, व्यापारी, कारखानदार जे वजन काटयांचा उपयोग आपल्या व्यवहारात करतात त्यांनी प्रमाणित असलेल्या व अधिकृत वजन काट्यांचाच वापर करावा असे आवाहन वैधमापनशास्त्र कार्यालयाव्दारे करण्यात येत आहे
.अलिकडच्या कालावधीत चीन या देशातून आयात केलेली अप्रमाणित वजन काट्यांची विक्री काही स्थानिक विक्रेत्यांकडून करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. अशा प्रकारची आयात केलेली इलेक्ट्रॉनिक काटे वैधमापनशास्त्र अधिनियम अंतर्गत असलेल्या नियमानुसार पडताळणी केलेली नसते. त्यामुळे त्यांचा वापर करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारच्या काट्यांची विक्री कोणत्याही अधिकृत परवानाधारक व्यक्ती किंवा बेकायदेशीरपणे विक्री करणा-या व्यक्तीनी करु नये, बेकायदेशीर विक्री करणा-या व्यक्ती किंवा त्यांचा वापर करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायदयात आहे.बेकायदेशीर तोलन उपकरणे वैधमापनशास्त्र विभागांच्या कार्यालयाव्दारे जप्त केली जातात. व वापरण्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते.
तसेच शेजारील राज्यातील वजन काटे यांची विक्री केली जाते. अशी तोलन उपकरणे ही कायदयातील तरतूदीनुसार पडताळणी केलेली व ज्यासोबत मूळ प्रमाणपत्र मूळ विक्री बिल असल्यास ती वापरणे कायदेशीर आहे. अन्यथा अशी वजन काटे विक्रेते व उपयोगकर्ते यांचेवर सुध्दा दंडात्मक कारवाई होऊ शकते. परराज्यातून सुटया भागांची मागणी करून काही अनधिकृत व्यक्ती या काटयांची निर्मिती करतात. व त्यावर आपले स्टिकर लावून विक्री करतात. अशी कृती सुध्दा बेकायदेशीर असून,त्यांच्यावर सुध्दा दंडात्मका कारवाई होऊ शकते. त्यामुळे अप्रमाणित वजने काटे मूळ प्रमाणपत्र व मूळ बिल नसलेली, सिल नसलेली काटे, अनधिकृत उत्पादकांनी उत्पादीत केलेली काटे यांचा वापर उपयोगकर्त्यांनी त्वरीत थांबवावा अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. शिवाय अशी वजन काटे जप्त केली जातील, अनधिकृत विक्रेते व अनधिकृत उत्पादकानी सुध्दा याची दखल घ्यावी. असे आवाहनही वैद्यमापनशास्त्राचे उपनियंत्रक यांनी केले आहे.
0 Comments