केंद्र व राज्यातील विकास योजनांमुळे मध्यप्रदेशमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता : आ मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- लाडकी बहिण योजना, शेतकरी कल्याणकारी योजनांसह केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या विविध विकास योजनांमुळे मध्यप्रदेश राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये व महिलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविषयी आदर आहे . राज्याचा व देशाचा विकास भाजपाच करु शकते हा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावरच देशात व राज्यात पुन्हा भाजपाच सत्तेवर येइल असा विश्वास भाजपचे विधानपरिषद सदस्य आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला . भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने आ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर मध्यप्रदेश राज्यातील अमरवाडा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली होती. आ मोहिते-पाटील यांनी आपल्या अमरवाडा विधानसभा मतदारसंघातील सात दिवसांच्या दौऱ्यात आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर या मतदारसंघातील आदिवासी , दलित , अल्पसंख्याक , महिला आदी मतदारांशी संपर्क साधला . त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या . राज्य व केंद्राच्या विकास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या की नाही याची चौकशी केली . विकास योजनांची माहिती दिली . सात दिवसांच्या संपर्क दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . आ.मोहिते पाटील म्हणाले, सर्व मतदार संघात भारतीय जनता पार्टी ला पोषक वातावरण आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजनांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे अमरवाडा विधानसभा मतदारसंघात व मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होईल. अमरवाडा विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने भाजपा विजय होईल. या मतदारसंघातील विविध समस्या राज्य व केंद्र पातळीवर पोहोचवून त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments