ज्याचे वक्तृत्व चांगले तो व्यक्ती आयुष्यात कधीच अडून राहत नाही - लांडगे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- वाचन करणे सोपे, सुसंबंध विचार करणे थोङे अवघङ पण वाचलेलं लक्षात ठेवून, सुसंबंधपणे विचार करुन ते लोकांपुढे व्यक्त करणे हि फार अवघङ गोष्ट आहे. हे व्यक्त होणं म्हणजेच वक्तृत्व. ज्याचं वक्तृत्व चांगलं तो व्यक्ती आयुष्यात कधीच अङुन रहात नसल्याचे मत मराठी माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष वि. ना. लांङगे यांनी व्यक्त केले.
हनुमान हायस्कुल व ज्युनिअर कालेज तांदुळवाङी येथे वै. हभप. सुखदेव शिंदे यांच्या ८६ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, शालांतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन दि. २३ व २४ आगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन वि. ना. लांङगे बोलत होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष शिवाजी दुधाट, उपाध्यक्ष दत्ताञय उघङे, सभापती विजय पवार, उपसभापती सुनिल शिंदे, विश्वस्थ अभिमान मिले, शशिकांत कदम, सचिव ज्ञानेश्वर उघङे, मार्गदर्शक मिलींद शिंदे, मुख्याध्यापिका अ.ल. कदम, प्राचार्य मा. मा. देवकर, स्पर्धाप्रमुख वि. ना साळुंखे उपस्थित होते.
स्पर्धेचे हे सलग १४ वे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून या स्पर्धेला स्पर्धक येत असल्याची व संस्थेच्या जङणघङणीची माहीती स्पर्धाप्रमुख वि. ना. साळुंखे यांनी प्रास्ताविकात दिली.
वि. ना. लांङगे पुढे म्हणाले, तुम्ही किती प्रापर्टी जमवली हे इतिहास विचारत नाही. पृण तुम्ही समाजासाठी काय केले हे माञ इतिहास विचारतो. राष्ट्रपुरुषांनी आपले तन! मन, धन देशाला अर्पण केल्यामुळेच आज आपण त्यांची आठवण ठेवतो.
यावेळी १ ली ते ४ थी गटात गाथा मिले (प्रथम), विराज खाङे (द्वीतीय), शार्दुल नारनवर (प्रथम), ५ वी ते ७ वी गटात तनिष्का जाधव देशमुख (प्रथम), सृष्टी मिले (द्वितीय), आदिती घोगरे (तृतिय), ८वी ते १० वी गटात सिध्दी तनपुरे (प्रथम), निलश्री यादव (द्वितीय), प्रणिती जाधव (तृतीय), खुल्या गटात मिथुन माने (सातारा-प्रथम), संकेत पाटील (गङहिंग्लज-द्वितीय), संतोष राजगुङे (भाळवणी-तृतीय), सामान्यज्ञान स्पर्धा १ ली ते ४ थी गट आशिष पाटोळे (प्रथम), आयान मुलाणी (द्वितीय), कल्याणी मिले (तृतीय), ५ वी ते ७ वी गटात वरद जाधव (प्रथम), प्रणव पवार (द्वितीय), शुभम जाधव (तृतीय), ८ वी ते १० वी गटात साक्षी निलटे (प्रथम), चैतन्य पवार (द्वितीय), आर्या फुलारे (तृतिय), ज्युनिअर विभागात प्राजक्ता तळे (प्रथम), अस्मिता मिले (द्वितीय), सार्थक आवताङे (तृतिय) यांनी यश संपादन केले. रक्तदान शिबिरामध्ये ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक उपक्रमास हातभार लावला. या वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरी, अमरावती, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथिल स्पर्धकांनी भाग घेतला होता.
0 Comments