राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शासकीय कार्यातील कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरावर 29 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले.
वयोगट 18 ते 40:-100 मीटर धावणे, योगा फुटबॉल, स्वदेशी खेळ, इनडोअर खेळ - बॅडमिंटन कॅरम, आर्म रेसलिंग त्याचबरोबर मनोरंजनाचे खेळ लंगडी, लिंबू, चमचा इत्यादी.
वयोगट 41 ते 60:- 50 मीटर धावणे, तीनशे मीटर धावणे, एक किलोमीटर चालणे, खो-खो, योगा, स्वदेशी खेळ, इन डोअर खेळ चेस, बॅडमिंटन, आर्म रेसलींग.
वयोगट 60 च्या वर:- तीनशे मीटर जोरात चालणे, एक किलोमीटर चालणे, स्वदेशी खेळ, इन डोअर खेळ, चेस, कॅरम.
मैदानी क्रीडा स्पर्धा रनिंग इत्यादी शासकीय मैदान नेहरूनगर विजापूर रोड सोलापूर येथे देण्यात येतील. तर इन डोअर खेळ बॅडमिंटन, कॅरम यांच्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे घेण्यात येतील. स्पर्धेसाठी वेळ सकाळी 9 ते सकाळी 11 असा राहील. असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
0 Comments