सहकार महर्षि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

सहकार महर्षि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

 सहकार महर्षि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते - पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालया मधील प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीमध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठया उत्साहात पार पडला.
      ‌या  कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे,उपविभागीय कार्यालय, सोलापूरमधील विशेष कर्तव्य अधिकारी डॉ.रमेश प्रभाकर काटे हे उपस्थित होते. स्वागत समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे,कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख,सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.त्यानंतर प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख प्रा.सौ.सुजाता रिसवडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य अतिथी,विद्यार्थी व पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,महाविद्यालयामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणा-या जयसिंह शिक्षण सन्मान योजना व विद्यावेतन योजनांबद्दल माहिती दिली व सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय हे उद्योजक निर्माण करणारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल अशी ग्वाही दिली.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी,शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ.रमेश काटे यांनी मनोगतामधून त्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले छंद जोपासावे,सध्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अद्यावत राहिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास जोपासला पाहिजे असे सांगीतले. हा कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सागर फुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय झंजे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages