सत्ताधारी मोदी सरकारचे काँग्रेसमुक्त भारत स्वप्न पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न..!
सोलापूर (दादासाहेब निळ):- "ज्याच्या हातात ससा तो पारधी " अशी एक मराठी म्हण आहे अगदी त्या प्रमाणेच सध्या केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांची पंख पूर्णपणे छाटण्याचा प्रयत्न करू लागला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यावरचा दबाव वाढविण्यासाठीच केंद्र सरकार अनेक मार्गाने म्हणजेच एडी सीबीआय इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून जो आपल्या पक्षात प्रवेश करत नाही किंवा जो मुख्य विरोधक आहे त्यांच्या घरावर छापे टाकण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर कळस म्हणजे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द .. किंवा राहुल गांधी यांच्या घरापर्यंत मोठा पोलिसांचा फौजफाटा पाठवणं.. कारण राहुल गांधी चा आवाज दाबल्यास कोणत्याही प्रकारची माहिती देशात पोहोचणार नाही याचीच काळजी मोदी सरकार घेत नसेल का ..?असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे.अदानी प्रकरणात जेपीसी समिती नेमण्याची मागणी सातत्याने करणाऱ्या राहुल गांधींचे तोंड दाबण्याचाच हा प्रकार असल्याचं सध्या देशभरातील नागरिकांतून बोलले जात आहे. अखेर शेवटी सत्याचाच विजय झाला असून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राहुल गांधी यांचे खासदारकी त्यांना बहाल केल्यामुळे न्यायालयाच्या या निर्णया मुळे सर्वसामान्य जनतेमध्ये लोकशाही जिवंत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. या देशांमध्ये लोकशाही नाममात्र ठेवून खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचे नामोनिशान मिटवण्यासाठीच सध्या मोदी सरकार आणि त्यांचे प्रामाणिक सहकारी मोठ्या ताकदीने धावत असल्याचे दिसत आहे.वास्तविक पाहता भारत जोडू यात्रेत काश्मीर दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी महिला लैंगिक अत्याचाराचे बळी जात आहेत याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात पावले उचलतील.त्यामुळे आपले अखंड सत्ताधीश होण्याचे स्वप्न अधुर राहील .या भीतीपोटीच राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठीच तब्बल दीड महिन्यानंतर त्यांच्या घरी पोलीस पाठवणे असेल किंवा एखादं जुनं प्रकरण उचकटून त्यांना शिक्षा सुनावणं असेल किंवा त्यांचे खासदारकी रद्द करणे . अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण सध्या सत्ताधाऱ्यांकडून होऊ लागला आहे. एकंदरीत हा प्रकार अतिशय खेदजनक आणि मनाला वेदना देणारा असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली परंतु शेवटी दूध का दूध आणि पाणी का पाणी अशा प्रकारचा निर्णय न्यायालयाच्या माध्यमातून मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या समाधानाचे ,चैतन्याचे वातावरण आहे. या सरकारला 2024 मध्ये मूठमाती देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे..केवळ सत्ता टिकवण्यासाठी देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष संपविण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या मोदी आणि शहा हे दोन प्रमुख नेते करू लागल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक पाहता हे दिल्लीचे अमोजी आणि नमोजी हे फक्त महाराष्ट्र आणि देशांमध्ये लोकसभेसाठी पोषक वातावरण तयार करू लागले असले तरी आणि मोदी लाट पूर्णपणे ओसरले असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भाजपाच्या अशा या सत्तेच्या बळावर काम करण्याची पद्धतीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकणार का ..? अशी भीती सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
0 Comments