शासकीय मैदानं.. आणि फुटपाथ बनले भाजी विक्रीचे केंद्र..!
महापालिका प्रशासनाची बघ्याची भूमिका..?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बेकारी वाढू लागल्यामुळे अनेक महिला आणि तरुण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथवर किंवा शासकीय मैदानावर अतिक्रमण करून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू लागल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या आबालवृद्धांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. सोलापूर शहरातील मुख्य भागातील सात रस्ता, रंगभवन आणि विजयपूर रस्त्यावरील फूटपाथ वर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. तसेच नेहरूनगर येथील शासकीय मैदान सुद्धा भाजीपाला विक्रेत्यांनी ताब्यात घेतल्यामुळे आणि अतिक्रमण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हे मैदान खेळाडूंसाठी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जातो आहे सकाळी आणि संध्याकाळी काही ज्येष्ठ नागरिक तथा महिला नेहरूनगर येथील या शासकीय मैदानावर फेरफटका मारण्यासाठी मोकळी हवा घेण्यासाठी जातात परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण वाढल्यामुळे मोकळा श्वास मिळत नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केले आहे. जुळे सोलापूर परिसरामध्ये हे एकमेव मैदान असूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्यामुळे आणि रस्त्याच्या दुतर्फा या व्यावसायिकांनी भाजीपाल्याचे आणि फळांचे स्टॉल लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर खराब झालेल्या भाज्या आणि फळे हे व्यापारी मैदानावरच फेकून देतात. त्यामुळे या व्यापाऱ्यांसाठी हे मैदान म्हणजे कचराकुंडी झाली की काय असा प्रश्न सध्या जेष्ठ नागरिकांतून विचारला जातो आहे. सध्या या मैदानावर घाणीचे साम्राज्य याल व्यापाऱ्यांमुळेच पसरले असल्यामुळे आणि हे मैदान अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे तात्काळ अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. याच मैदानाच्या जवळ असणाऱ्या फुटपाथवर काही मासे विक्रेते सुद्धा मोठ्या प्रमाणात मासे विक्री करतात आणि मासे कट करताना पडणारी घाण हे व्यापारी उचलून दुसरीकडे न टाकता त्याच ठिकाणी ठेवतात त्यामुळे या ठिकाणी कुत्र्यांची सुद्धा मोठी फौज हे खाण्यासाठी येथे त्यामुळे फिरायला जाणारा नागरिकांना कुत्र्यांची फार मोठी भीती वाटू लागली आहे कारण हे कुत्री अचानकपणे भुंकतात आणि अंगावर सुद्धा येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या भागातून जाताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच या मैदानावर जावं लागतं. वास्तविक पाहता उघड्यावर मासे विक्री करणे योग्य असून याला कोणीही विरोध करत नाही त्याचबरोबर बेकायदेशीरपणे फुटपाथ अडून हे व्यापारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची अडवणूक करतायेत त्यामुळे महापालिकेने तात्काळ या अतिक्रमणधारकांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून आणि महिलातून बोलले जात आहे.सध्या सोलापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अतिशय धुमधडाक्यात सुरू असून पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम या मैदानाकडे लक्ष देणार का..? असा यक्षप्रश्न या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू तसेच महिलातून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.
0 Comments