Hot Posts

6/recent/ticker-posts

समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य जनता नेहमी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी- आ. प्रणिती शिंदे

 समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य जनता नेहमी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी- आ. प्रणिती शिंदे


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य जनता नेहमी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असून .सोलापूर जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची संख्या मोठी आहे.  हा समाज कष्टाळू आहे.आणी नेहमी पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे . सध्या देशात महागाई बेरोजगारी वाढली असून सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे. विरोधकांना येत्या काळात सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर समाज संघटित करण्याची गरज आहे. साठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत आमदार प्रणितीताई शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना बोलताना व्यक्त केले.

सोलापूर जिल्हा काँग्रेस विमुक्त जाती भटक्या समाजाचा मेळावा काँग्रेस भवन येथे संपन्न झाला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र आ.प्रणितीताई शिंदे , डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, प्रदेश विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्षा अँड. पल्लवीताई रेणके यांच्या हस्ते देण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही. भटक्या समाजाच्या पाठीशी नेहमी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला असून येणाऱ्या काळात देशाचे पंतप्रधान म्हणून राहुलजी गांधी यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील यांनी केले.

 आगामी लोकसभा निवडणूकीत महत्त्वाची आहे. प्रणितीताई शिंदे यांना सोलापुरातून व डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील यांना माढ्यातून खासदार करण्यासाठी भटक्या समाजाने पुढे यावे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात भटक्या विमुक्त जाती समाजाची संख्या मोठी आहे. याचा फायदा येणाऱ्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे निश्चित होणार आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती- भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षा ऍड. पल्लवीताई रेणके म्हणाल्या.

 भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक पक्षाशी निष्ठेने राहिले आहेत. इतर पक्षाची तत्वे त्यांना अजिबात मान्य नाहीत. काँग्रेस पक्षच आपला पक्ष आहे. असे त्यांना वाटते. लोकांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आपण काँग्रेस पक्षात साथ द्यावी अशी आवाहान विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले यांची आपल्या प्रस्तावित  केले.

विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे काम सोलापूर जिल्ह्यात चांगले आहे. समाज संघटित आहे. सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम जोमाने सुरू आहे. असे प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण म्हणाले.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे. प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे, सरचिटणीस भीमराव बाळगे, प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण, शहर काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अशोक निंबर्गी प्रदेश सचिव किसन मेकाले, संघटक रमेश हसापुरे, भिमराव बंडगर, भोजराज पवार, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, मल्लेशी बिडवे, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, शहर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, दादा सुकळे, श्रीशैल रणखांबे, लखन राठोड, नेहरू क्षेत्री, गौतम मसलखाब, माजी नगरसेवक रवी यलगुलवार, मल्लेशी सूर्यवंशी, कवी अंबादास जाधव, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलिंग शटगार सर यांनी केले.

निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.
प्रदेश सचिव भीमराव बंडगर, बार्शी तालुका अध्यक्ष विष्णू अस्वदे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष अनिल पवार, टेंभुर्णी शहराध्यक्ष मुकुंद ननवरे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पवार ,माढा तालुका अध्यक्ष अनिल धोत्रे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षेत्रिय ,करमाळा तालुका अध्यक्ष देवराज सुकळे, सांगोला तालुका अध्यक्ष सोमनाथ हिंगमिरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष गोकुळ धोत्रे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष राजकुमार राठोड, अक्कलकोट तालुका अध्यक्ष वसंत राठोड, अक्कलकोट शहर अध्यक्ष विकास राठोड, मोहोळ शहराध्यक्ष शेटीबा पवार, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पवार,  शिवाजी काळे जिल्हा उपाध्यक्ष संजू पवार जिल्हा चिटणीस, आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments