सदृढ व निरोगी आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा
अनगरच्या पाटील विद्यालयात शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
अनगर (कटूसत्य वृत्त):- आजच्या धावपळीच्या युगात तरुणांची जीवनशैली बदलली असून मोबाइल प्रवत्तीमुळे तो आळशी बनत चालला आहे परिणामी तरूण वर्ग विविध व्याधींनी त्रस्त आहे त्यातून त्याला निरोगी आनंदी जीवन जगाण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्त आहे. सदृढ व निरोगी आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत असे मत सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी अनगर येथे व्यक्त केले.
सोमवार दि. 28 आॅगस्ट रोजी सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद संचलित तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले त्याचे उद्घाटन सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
मान्यवराच्या हस्ते प्रथम लोकनेते बाबुरावअण्णा पाटील व मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. महादेव चोपडे यांनी प्रस्ताविक केले तर प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व विशद केले. यावेळी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत मनोरमा घाटुळे हीची रेंज फाॅरेस्ट आॅफिसरपदी(वनक्षेत्रपाल) निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. गायत्री ढेरे हीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आकर्षक ज्योत संचलन करण्यात आले.मोनाली भोसले हीने खेळाडूना शपथ दिली.मान्यवरांनी क्रीडागणाची पूजा करून हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले
याप्रसंगी सिनेट सदस्य अजिंक्याराणा पाटील, सुनिलनाना घाटुळे,प्राचार्य चंद्रकांत ढोले, तालुका क्रीडा प्रमुख संभाजी चव्हाण, उपप्राचार्य सिताराम बोराडे,परिवेक्षक चंद्रकांत यावलकर, महादेव चोपडे, बब्रुवान बोडके,रवि बोडके, दाजी गुंड, चंद्रकांत सरक,पाटील, नाना खराडे, अर्चना गुंड, प्रभाकर बंडगर,रमेश चव्हाण, सत्यवान कांबळे,सोमनाथ ढोले,विलास गुंड,हरी शिंदे,पंढरीनाथ थिटे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर संभाजी चव्हाण यांनी आभार मानले.
0 Comments