श्री सिद्धेश्वर वुमेन्समध्ये तीन दिवसीय डेव्हलपमेंट प्रोग्राम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नेहमीचं अग्रेसर असलेल्या सोलापुरातील श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातमार्फत आयोजित तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम इ डी ए टूल्स व वर्चुअल लॅब या विषयावरती दि. २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान रोजी संपन्न झाला. श्री मोहन पटेल यांनी असे प्रोग्राम आयोजित केल्याने प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडत असून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे असे नमूद केले व नवनवीन तंत्रज्ञान संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अवगत करून घेऊन त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन क्षेत्रात करता येतो असे ते म्हणाले. सी ओ इ पी पुणे येथून श्री अमोद हरणखेडकर यांनी वर्च्युअल लॅबबद्दल प्रात्यक्षिक आधारे माहिती दिली. प्राचार्य श्री गजानन धरणे यांनी सर्व विद्यार्थी प्राध्यापक यांचे स्वागत करून सर्व संस्थांचालक व संस्थांचे प्राचार्य यांचे अभिनंदन केले. चांगले विद्यार्थी घडवत असताना प्राध्यापक घडले पाहिजेत यासाठी असे प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय चांगले प्रोग्रामचे आयोजन केल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक विभागाचे कौतुक केले. प्रा. प्रमोद शिवगुंडे यांनी प्रोग्रामची प्रस्तावना केली तर प्रा. माळगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रमोद मेणसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काढली यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments