शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयाला आएसओ मानांकन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयाला आएसओ मानांकन

 शिवरत्नच्या बीबीए महाविद्यालयाला आएसओ मानांकन


अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील शिवरत्न शिक्षणा संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन महाविद्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. संस्थेचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविद्यालयाच्या सेवकांच्या समवेत प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांना मानांकनाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. आय एस ओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालय विकास मंडळाचे अध्यक्ष तानाजी काशीद, पालक संचालक डॉ. विश्वनाथ आवाड, संस्थेचे वरिष्ठ संचालक प्रा. शिवदास शिंदे, प्रशासनाधिकारी अश्रफ शेख आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले . 
 व्यवसायिक शिक्षण देणारे हे महाविद्यालय २००९ पासून सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन पदवीसाठी सोयीचे ठरले आहे. आयएसओ हे एक आंतरराष्ट्रीय मानक संस्था असून त्यांच्यामार्फत तंत्रज्ञान, वैज्ञानिक चाचणी प्रक्रिया, कामाची पद्धत, सामाजिक समस्या अशा मुद्द्यांवर अभ्यास करून मानकाचे प्रमाणपत्र दिले जाते. याचा उपयोग संस्थेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. उत्पादन व सेवांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी मदत होते. व्यवस्थापन प्रणाली निर्माण करून दस्तऐवज प्रक्रिया समाविष्ट करता येते. संस्थेने निर्माण केलेल्या उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता,  सुरक्षा व  सुनिश्चितता संबंधी मानक प्रदान करते.

-चौकट
आयएसओ मानांकित संस्था तिच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी  उपयुक्त ठरते. या प्रमाणपत्राच्या मदतीने  संस्था विकसित केली जाते. आयएसओ च्या अंमलबजावणी द्वारे संस्थेतील संसाधन व कार्यक्षमता वाढवता येते  व दर्जेदार शिक्षण देण्यास मदत होते. 
- शितलदेवी मोहिते -पाटील, अध्यक्षा, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज

~ चौकट
 आयएसओ ही स्वतंत्र संस्था आहे की जे कंपनी तसेच शिक्षण संस्था आणि उद्योगांना मानक प्रमाणपत्र देते. आयएसओ मानक एखाद्या संस्थेच्या विश्वासाचा आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते.  म्हणून स्पर्धेत  टिकून राहण्यासाठी गुणवत्ता  सिध्द करून आयएसओ  मानांकन मिळविणे फायद्याचे ठरते.
 - धैर्यशील मोहिते पाटील, कार्याध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज
 
 आयएसओ मानांकनाचे  प्रमाणपत्र मिळाल्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी  मदत होईल. महाविद्यालयात  शिक्षण घेऊन विद्यार्थी कार्यक्षमतेने क्रियाशील होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले भविष्य आजमावू शकतात. - डॉ. अरविंद कुंभार, प्राचार्य, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages