अवैध सावकारांच्या विरोधात सावकार ग्रस्त शेतकरी समिती उतरणार रस्त्यावर..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

अवैध सावकारांच्या विरोधात सावकार ग्रस्त शेतकरी समिती उतरणार रस्त्यावर..!

 अवैध सावकारांच्या विरोधात सावकार ग्रस्त शेतकरी समिती उतरणार रस्त्यावर..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आत्महत्या मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली असली तरी सुद्धा सध्या राज्यामध्ये सावकारांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचबरोबर महागाईचे चटके सुद्धा सर्व सामान्य माणसांना बसत आहेत.
नुसतच सर्वसामान्यांचे आणि गोरगरिबांचं सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांची दिशाभूल करत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी बोकाळे आहे. तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी खाजगी सावकारांच्या विरोधात फार मोठी मोहीम उभा केल्यामुळे खाजगी सावकारी ला पूर्णविराम मिळालेला होता परंतु सध्या पुन्हा अवैध सावकारी वाढत आहे. मोहोळ तालुक्यातील सोमनाथ वसंत पवार या तरुण शेतकऱ्यांनी 27 मे 2023 रोजी सावकाराच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे या शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आलेले आहे. तरीसुद्धा त्या गावातील सावकार या कुटुंबाला त्रास देत आहे. कामठी पोलिसांनी या प्रकरणाला अद्याप न्याय न दिल्यामुळे आरोपी फरार आहेत. सर्वसामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास यामुळे कमी होत असून सावकाराच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी गाव सोडून स्थलांतर केले आहे. सावकार गुंडगिरी चा वापर करून पीडित शेतकऱ्यांच्या महिलांना सुद्धा त्रास देण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सावकारांना व्यसन घातली पाहिजे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे असे मागणी शेतकरी समितीने केली असून या कुटुंबांना त्वरित न्याय मिळावा. अन्यथा सावकार ग्रस्त शेतकरी समिती आणि इतर शेतकरी संघटना एकत्र होऊन येत्या 18 ऑगस्ट पासून जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल नाईक नवरे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages