Hot Posts

6/recent/ticker-posts

"कोन्हाळी च्या" सरपंचाच्या महा भ्रष्टाचाराची ईडी मार्फत चौकशी करा...!

 "कोन्हाळी च्या" सरपंचाच्या महा भ्रष्टाचाराची ईडी मार्फत चौकशी करा...!

अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांचा इशारा...!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या भ्रष्टाचार शिष्टाचार होत  चालला असल्यामुळेच को न्हाळी चे विद्यमान सरपंच चिदानंद उण्णद पैशाचा वापर करून बोगस दाखल्याच्या आधारावर सरपंच पद प्राप्त केले. प्राथमिक शाळेपासून तहसील कार्यालयापर्यंत चे सर्व पुरावे बोगस सही शिक्क्याने मिळवल्याचे उघड झाले असून सध्या सरपंच जात पडताळणी समिती पुढे गैरहजर राहून वेळ मारून घेत आहे. याशिवाय रेल्वेत नोकरी लावतो म्हणून जवळपास दहा ते पंधरा तरुणांना तीस लाख रुपयांना टोपी घालून या सरपंचाने गंडवले असून आरोग्य विमा क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने ही भ्रष्टाचाराचं राकेट हे सरपंच चालवत असून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत केली आहे.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव म्हणाले की, कोन्हाळी चे विद्यमान सरपंच  चिदानंद उण्णद यांनी महा भ्रष्टाचार केला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून तहसील कार्यालयापर्यंत चे सर्व दाखले त्यांनी बनावट तयार करून दिले आहेत. त्यांना दाखले देणारे मुख्याध्यापक सध्या फरार आहेत.
हे सर्व दाखले निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांनी जात पडताळणी समिती समोर सादर करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. मूळ हिंदू लिंगायत असलेला दाखला हिंदू कोष्टी असा बोगस तयार करून त्यांनी ओबीसी प्रवर्गातून सरपंच पद मिळवले. निवडणूक आयोग आणि शासनाची त्यामुळे फार मोठी फसवणूक त्यांनी केलेली आहे. सरपंच चिदानंद उण्णद यांची खरी जात लिंगायत असल्याचे सर्व पुराव्यानिशी सिद्ध झालेले असून सुद्धा ते सध्या सरपंच पद भूषवित आहेत. बोगस जात प्रमाणपत्र तयार करून देण्यामध्ये येथील विद्यमान मुख्याध्यापक मानसिंग पवार यांचा हात असून यामध्ये फार मोठी आर्थिक मांडवली झाल्याचं दिसून येतोय.
महाराष्ट्रामध्ये गुजराती भाषेतला दाखला देऊन त्यावर मराठीत सही शिक्का मारून बोगस दाखला जात समिती समोर सादर केला आहे. ही माहिती मिळताच बनावट दाखला देणारे मुख्याध्यापक मानसिंग पवार हे फरार असून ते शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच ते तारखेला सुद्धा गैरहजर राहत आहेत. विद्यमान सरपंचाचे केवळ जात प्रमाणपत्रच बोगस नसून त्यांनी रेल्वेत नोकरी लावण्याची आम्हीच परिसरातील तरुणांना दाखवून त्यांच्याकडून तीस ते पस्तीस लाख रुपये उकळून तरुणांची फार मोठी फसवणूक केली आहे. त्याची तक्रार उल्हासनगर जिल्हा ठाणे पोलीस ठाण्यामध्ये दाखल  आहे. केंद्रीय विभागातील हा फार मोठा भ्रष्टाचार असून राज्यात अनेक ठिकाणी त्याचे बनावट लॅब असून बेंगलोर येथील एका आरोग्य विभाग कंपनीची फसवणूक करून बोगस विमा प्रकरणाचा महाराष्ट्र हादरवणारा हा साखळी भ्रष्टाचार असल्याची चर्चा सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. सरपंच सध्या मुंबईत असून ते स्थानिक पुढाऱ्यांची मोबाईलवर डीपी ठेवून आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी केविलवाना प्रयत्न करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात जी कामे मजुरांकडून केली पाहिजे तीच कामे जेसीबी किंवा इतर यंत्राच्या साह्याने करून त्या ठिकाणी सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्यामुळे ती कामे सध्या शासनाने बंद ठेवले आहेत.  प्रचंड मोठा महा भ्रष्टाचार करून सुद्धा सरपंच मुंबईमध्ये साळसूतपणे फिरत आहेत त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही त्यामुळे शासनाने सरपंच चिदानंद उण्णद यांच्या संपूर्ण भ्रष्टाचाराची त्वरित तातडीने ईडीमार्फत चौकशी करावी अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांनी शेवटी दिला आहे.

चौकट
को न्हाळीचा विद्यमान सरपंच चिदानंद उण्णद यांनी बोगस जातीच्या दाखल्याच्या आधारावर निवडणूक आयोगाने शासनाची फसवणूक करून सरपंच पद प्राप्त केल आहे.
याबरोबरच अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची आमिष दाखवून लाखो रुपयांना तरुणांना गंडवले आहे. त्याचबरोबर विमा कंपनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार केल्यामुळे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी
मागणी सरपंच पदाचे पराभूत उमेदवार तथा निवृत्त शिक्षक विठ्ठल जाधव यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments