येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदाराला २ लाखांचे मताधिक्य देणार -आमदार बबनराव शिदेचे मोठं विधान
माढा (कटूसत्य वृत्त):-
येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघात भाजपच्या खासदाराला २ लाखांचे मताधिक्य देणार असल्याचे वक्तव्य
माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.
माढेश्वरी अर्बन बॅकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आमदार बबनराव शिंदेनी माढ्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार शिंदेनी माळशिरस भागातील कार्यक्रमात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना २ लाखांचे मताधिक्य देण्याचे वक्तव्य केले होते.अकलुजच्या मोहिते पाटील व निंबाळकर यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाल्याने आमदार बबनराव शिंदेचे वक्तव्य मोहिते पाटील गटाच्या समर्थकांना झोंबले होते. आमदार शिंदेच्या वक्तव्यावर मागील निवडणुकीत स्वतःचा भाऊ उभा असताना निवडणुन आणता आले नाही.मताधिक्य काय देतील असा टोला लगावला होता.त्यावर आज आमदार बबनराव शिंदेनी प्रत्युतर दिले.गत निवडणुकीत मी विरोधात असताना देखील माळशिरस भागातून १ लाखाचे मताधिक्य मिळवुन दिले होते.आता आम्ही सत्तेत असल्याने भाजपच्या खासदाराला २ लाखाचे मताधिक्य नक्कीच मिळवुन देणार असल्याचे वक्तव्य केले आहे.रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा भाजपाचे उमेदवार असतील का ? या प्रश्नावर आमदार शिंदेनी मी काय भाजपचा प्रवक्ता नाही असे उत्तर दिले. शरद पवार व त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील या दोघांनी माढा लोकसभेचा गड राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला होता.त्यानंतर मात्र उमेदवारीमुळे नाराज सत्र झाल्याने मोहिते पाटील तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी पासुन दूरावले गेले.आणी ते कमळवासीय झाले.त्यातुनच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली. आणी संजयमामा शिंदेना राष्ट्रवादीची उमेदवारी शरद पवारांना जाहीर केली.या दुरंगी लढतीत माढ्याचा राष्ट्रवादीचा गड निंबाळकर यांनी ताब्यात घेऊन कमळ फुलवले.त्यानंतर पाच वर्षात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर बरंच पुलाखालून पाणी गेले आहे.राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्यानंतर अजित पवारांच्या पाठिशी राहिलेले माढ्याचे आमदार बबनराव शिंदे,करमाळ्याचे आ.संजयमामा शिंदे हे बंधु उभे आहेत.एकीकडे आमदार बबनराव शिंदेनी माढा लोकसभेवर राष्ट्रवादीच्या जाागेचा दावा करणे अपेक्षित असतानाच आमदार बबनराव शिंदेनी मात्र थेट भाजपचा खासदार निवडुण आणण्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असुन अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागलेत.एकीकडे मागील महिन्यातच भाजपाच्या टेभुर्णीत झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माढ्याचा आमदार भाजपचा करायचा आहे.असं वक्तव्य केले होते.त्यानंतरच आता राष्ट्रवादीच्या आमदार बबनराव शिंदेनी भाजपचा खासदार निवडुण आणण्याची भाषा केेली आहे. यावेळी माढेश्वरी बॅकेचे उपाध्यक्ष अशोक लुुणावत,बॅकेचे संचालक प्रा.गोरख देशमुख आदी उपस्थित होते.
चौकट) काय म्हणाले आमदार बबनराव शिंदे-दोन्ही पवारांची झालेल्या भेटीची मला टिव्हीवरील बातम्यांतूनच माहिती झाली.या दोन्ही मोठ्या व्यक्तिमत्त्वावर प्रतिक्रिया देण्या इतपत मी मोठा नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या गटाच्या तालुका अध्यक्ष पदाच्या निवडी रखडल्या आहेत.याबाबत आमदार शिंदेना विचारले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून एकच आहे.असे ठोस वक्तव्य आमदार शिंदेनी केले.
.jpg)
No comments:
Post a Comment