पंढरपूरमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

पंढरपूरमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा

 पंढरपूरमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा

पंढरपुर  (कटूसत्य वृत्त):-पंढरपूरमध्ये आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर आदिवासी समाजाच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली तसेच विविध मान्यवरांची मनोगतं झाली.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी बांधव आहेत. या आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत, हे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, निश्‍चितच येत्या काळात आमच्या लढ्याला यश मिळेल. यासाठी आपली एकजुट कायम असावी. आपल्या न्याय हक्क्कासाठी लढतो तोच समाज सुखी आणि विकसाभुमख आयुष्य जगु शकतो, शिक्षण, संघटीत राहणं आणि संघर्ष करणं चालु ठेवुया आणि आज जागतिक आदिवासी दिनादिवशी याबाबतचा संकल्प करुया. सर्व समाज बांधवांना जागतीक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा! असे मनोगत यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
यावेळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायमशाळा, वाल्मिकी भवन, आदिवासी भवन, आपटे उपलप प्रशाला, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे रुग्णालय (सामान्य (कॉटेज) रुग्णालय), दिनदयाळ कोळी वाडा, व चंद्रभागेतील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकावर आदिवासी दिनानिमित्त दिवसभर आदिवासी समाज बांधवांनी येऊन अभिवादन केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश अंकुशराव, सुधीरभऊ अभंगराव, माऊली अधटराव, दादा करकमकर, राहुल परचंडे, सोनु अधटराव, सिध्दनाथ कोरे, विनायक संगीतराव, अनिकेत शिरसट, अमोल माने, दादा ननवरे, अभंगराव बुवा, लखन माने, अमित नेहतराव, दिनेश माने, विशाल अभंगराव, विकी अभंगराव, संपत सर्जे, मनमोहन अभंगराव, मोनु अधटराव, अक्षय म्हेत्रे, संजय माने, वैभव कांबळे, रामकृष्ण कोळी, महेश माने, रोहित नेहतराव, अमर संगीतराव, किरण पांढरे, प्रकाश कोळी, श्रीकांत ननवरे, श्रीनाथ संगीतराव, आकाश माने, अरविंद नाईकवाडी,  विशाल कोताळकर, सोमनाथ भादुले, पांडुरंग कोळी, ज्ञानेश्‍वर कोळी, रमेश तारापुरकर, सुरज नेहतराव व असंख्य आदिवासी कोळी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages