माढ्यातील प्रेम प्रकरणातील व्यापारी हल्ल्यातील मारेकऱ्यांना १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी,
मारेकऱ्यांचे तपासा कामी गुन्ह्याचे साहित्य गोळा करण्याचे काम सुरु
|माढा (कटूसत्य वृत्त):-
माढा शहरातील व्यापारी महेंद्र शहा यांच्या वर झालेल्या प्राण घातक हल्ला प्रकरणातील मारेकऱ्यांना १५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढा न्यायालयाने ठोठावले आहेत.
प्रेम विवाहास अडथळा ठरत असल्यामुळे मुलगी साक्षी शहा हिच्यासह प्रियकर चैतन्य कांबळे यांचेसह एकुण ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असुन या पुर्वी देखील न्यायालयाने मारेकऱ्यांना पोलिस कोठडीत ठेवले होते.तपासा कामी माढा पोलिसांनी व सरकारी वकिलांनी वाढीव पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.त्यानुसार माढा न्यायालयाने पोलिसांची मागणी व सरकारी वकिल नामदेव कांबळे यांची मागणी मान्य करीत गुन्ह्यातील साहित्य व पुरावे गोळा करण्या कामी १५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश श्रीमती व्ही.सी.क्षीरसागर यांनी ठोठावलेत.
पोलीस निरीक्षक बि.एस.खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद शेख अधिक तपास करीत आहेत.
चौकट) गुन्ह्यातील साहित्य अन सीसीटीव्ही फुटेज केले गोळा-
मारेकऱ्यांनी शहा यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्यात वापरलेली गुन्हयातील साहित्य तसेच ते ज्या ठिकाणी मारेकरी गेले होते.त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज माढा पोलिसांनी तपासकामी हाती घेतले असुन मारेकऱ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या ठिकाणी नेऊन माहिती घेण्यात आली. शहा यांच्या तब्यतीत सुधारणा-महेद्र शहा यांना हल्यात झालेली मारहाण ही गंभीर दुखापत असुन डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सोलापूरात उपचार सुरु आहेत.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली असुन मेंदुची सुज कमी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे
No comments:
Post a Comment