मोहोळ तालुक्यातील शाळांच्या सोयी सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील बाळराजे पाटील यांची ग्वाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 14, 2023

मोहोळ तालुक्यातील शाळांच्या सोयी सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील बाळराजे पाटील यांची ग्वाही

 मोहोळ तालुक्यातील शाळांच्या सोयी सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील बाळराजे पाटील यांची ग्वाही


टाकळी सिकंदर मध्ये लोकसभागातून १५ सायकलींचे वाटप

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण शिक्षणाची मोठी जबाबदारी गेल्या अनेक दशकापासून जिल्हा परिषदेच्या शाळांवर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आजही आपली गुणवत्ता आणि विचारांचे वेगळेपण टिकवून आहे. यापुढील काळातही मोहोळ मतदारसंघातील जि.प.च्या शाळांच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. शाळांसाठी सुविधा आणि शाळांच्या विकासासाठी शासन स्तरावरून आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी टाकळी सिकंदर येथे दिली .टाकळी-सिकंदर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायकल बँक उपक्रमा अंतर्गत  लोकसहभाग वर्गणीतून १५ गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सायकल वाटप कार्यक्रमास लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी  उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळराजे बोलत होते.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण,शिवाजीराजे  चव्हाण ,भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,अशोक चव्हाण, उपसभापती प्रशांत बचूटे, बंडगर गुरुजी,विकास मामा कोकाटे,सुधीर बसाटे, सिद्धेश्वर बचूटे, संजय क्षिरसागर गुरुजी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages