विठ्ठलगंगा फार्मर प्रोडूसर कंपनीची थेट परदेशात निर्यात सुरु - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

विठ्ठलगंगा फार्मर प्रोडूसर कंपनीची थेट परदेशात निर्यात सुरु

 विठ्ठलगंगा फार्मर प्रोडूसर कंपनीची थेट परदेशात निर्यात सुरु

रोज 5 कंटेनर रवाना , केळी उत्पादकांना मिळणार दर्जेदार भाव



कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):- दि. 24 रोजी विठ्ठल गंगा फार्मर कंपनी निमगाव टे या ठिकाणी केळी निर्यातीचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कंपनीने या हंगामातील पहिले पाच कंटेनर निर्यातीसाठी कंपनी स्थळावरून पाठवण्यात आले. हा कार्यक्रम कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे यांच्या आई सौ शारदाताई रमेशराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  यावेळी  परिसरातील महिला सभासद माल पुरवठादार वाहन मालक कंपनीचे संचालक व कर्मचारी  उपस्थित होते . 

    यावेळी शेतकरी दांपत्याच्या हस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे यांनी यापुढे सभासद व शेतकरी केळी योग्य दरात काढली जाईल व वेळेत केळीचे सर्व बिल दिले जाईल व त्यामध्ये नियमित्ता राहील असे बोलताना सांगितले.  त्याचबरोबर केळी लागवडीसाठी लागणारे रोपे त्यानंतर मार्गदर्शन औषधे व काढणी या सर्व गोष्टी कंपनी करणार आहे.  यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा माल उत्पादित करावा यासाठी अहवान केले आहे . कारण उत्पादित झालेला माल चांगल्या क्वालिटीचा असेल तर विक्री करण्यास व भाव घेण्यास सोपे जाते व त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करावी व असलेल्या केळीची नोंद कंपनीकडे द्यावी असेही आव्हान यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

     केळी पिकाला जगात मागणी आहे. शेतकऱ्यांनी केळीचे दर्जेदार उत्पादन घेतल्यास परदेशात चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांनी फळबाग पिकांकडे वळावे. विठ्ठलगंगा कंपनी माझी नसुन ही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. शेतकरी वर्गाचा आर्थिक स्थर उंचावणे हाच उद्देश आहे. 

       धनराज शिंदे

चेअरमन -विठ्ठलगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages